*जुन्या जीर्ण तहसिल इमारतीमुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ ; जीव मुठीत घेऊन करत आहे कर्मचारी कामे*
नितीन फुलझाडे
चिखली : जुन्या तहसिल कार्यालयाची इमारत जिर्ण झालेली आहे. सदर इमारतीमध्ये सन 1930 पासूनचे महसुल व प्रशासनाशी संबंधीत अत्यंत महत्वाचे रेकॉर्ड ठेवण्यात आलेले आहेत. रेकॉर्ड मिळवण्यासाठी तहसिल कार्यालयातील कर्मचारी व नागरिकांना प्रत्यक्ष इमारतीत प्रवेश करावा लागतो. ज्यामुळे ते आपल्या जिव धोक्यात घालतात, या परिस्थीतीकडे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. एकीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाची इमारत चांगल्या स्थितीत असतांना परवानगी न घेता पाडल्या जाते. मात्र चिखली तहसिलची नवीन इमारत का बांधल्या जात नाही ? प्रशासनाने संभाव्य धोका टाळण्यासाठी तातडीने जुन्या तहसील कार्यालयातील रेकॉर्ड सुरक्षित ठिकाणी हलवावे, अशी मागणी तालुका व शहर काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.
सोमवार २१ जुलै रोजी काँग्रेसच्या वतीने चिखली तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. निवेदनात नमूद आहे की, चिखली येथील जुने तहसिल कार्यालय ही इमारत सन 1930 साली बांधली गेलेली असुन सध्या ती रेकॉर्ड रूम म्हणुन वापरली जात आहे. सदर इमारतीमध्ये सन 1930 पासुनचे महसुल व प्रशासनाशी संबंधीत अत्यंत महत्वाचे रेकॉर्ड ठेवण्यात आलेले आहेत. ही इमारत सध्या पूर्णतः जिर्ण, धोकादायक स्थितीत असुन कधीही अनुचित प्रकार घडू शकतो. विशेषतः इतर सार्वजनीक विभागातील सुस्थितीत असलेल्या इमारती ‘‘जिर्ण’’कारण देवुन रातोरात पाडल्या जातात, परंतु येथे 90 वर्षापेक्षा जास्त जुनी असलेली, प्रत्यक्षात धोकादायक इमारत असूनही कुठलीही तातडीची काळजी घेतलेली नाही. तरी या विषयाची गांभीर्याने दखल घेवून त्वरील कारवाई करावी, जर सदर ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडला, तर त्यास पुर्णतः प्रशासन जबाबदार राहील, अशा इशारा काँग्रेसच्या वतीने देण्यात आला.
याप्रसंगी तालुका कॉग्रेसचे अध्यक्ष रामभाऊ जाधव, शहर चिखली शहर अध्यक्ष राहुल सवडतकर, माजी अध्यक्ष अतरोधीन काजी, दीपक देशमाने, डॉक्टर मोहम्मद इसरार, कुणाल बोंद्रे, प्राध्यापक निलेश गावंडे सर, प्राध्यापक राजु गवई सर, सभापती डॉक्टर संतोष वानखेडे, युवक कॉग्रेस अध्यक्ष रिक्की काकडे, श्याम पठाडे, डॉक्टर सत्येंद्र भुसारी, अशोकराव पडघान, किशोर कदम, ज्ञानेश्वर सुरूशे, नगरसेवक राजु रज्जाक, विजय गाडेकर, विलास कंटुले, गोपाल देव्हडे, गोकुळ शिंगणे, बिदुसिंग इंगळे, जय बोंद्रे, शिवराज पाटील, विजय जागृत, डॉ. अमोल लहाने, कैलास खराडे, प्रदिप पचेरवाल, अमिनखॉ उमस्मानखॉ, दिपक थोरात, खलील बागवान, शहीजाद अली खान, डॉ. संजय घुगे, अॅड विलास नन्हई, सचिन शेटे, शेख बबलु, रामेश्वर भुसारी, समद हाजी, प्रमोद रत्नपारखी, रोहण पाटील, विकास लहाने, रामधन मोरे, दत्ता करवंदे, समाधान गिते, नजिर कुरेशी, मनोज जाधव, प्रकाश चव्हाण, कैलास कांडेलकर, गजानन वांजोळ, बाशिद जमदार, भास्कर चांदोरे, शकील भाई, संजय गिरी, शिवा म्हस्के, संजय महाले, आरिफ बागवान, जाकीर शेख, हादी शेख, सादीक जमदार,अकील खान, हाबीब भाई, सोहील शेख, रवि लोखंडे, नितीन वाघ, शेषराव साळवे, प्रदिप साळवे,शेख अजिम, दिनकर जाधव, मनोहर हिवाळे, प्रदिप शेजोळ, भास्कर अण्णा धमक, नंदु आंभोरे, शेषराव आंभोरे, अंबादास वाघमारे, भारत मुलचंदानी, बिबीशन राठोड, गुलाब आंभोरे, परशराम राठोड, सुभाष खरात, कुंदन यंगड, कैलास गायकवाड, दत्तात्रय येवले, सदुनाना ठेंग, विष्णु पाटील, भिमराव हिवरकर, बळीराम इंगळे, नागेश आंभोरे, विष्णु सोळंकी, संजुनाना सोळंकी, समाधान आकाळ, शुभम बुरकुल, लक्ष्मण भिसे, बाळु ढंगारी, प्रथमेश वानखेडे, संदेश वानखेडे, प्रेम वानखेडे, सागर साळवे, व्यंकटेश रिंढे, एन.टी.भुसारी, ज्ञानेश्वर गांवडे, विष्णु गि-हे, राजीक कुरेशी, संतोष ठेंग, राहुल चवरे, अजिम खान, आशिष थोरात, दत्तात्र साळवे, इरियास शेख, समिर शेख, संजय गुंजकर, भारत गायकवाड, यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
*कर्मचारी व नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी इमारत बंद करावी : राहुल सवडतकर*
प्रशासनाने तातडीने सदर इमारतीची पाहणी करून रेकॉर्ड दुस-या सुरक्षित ठिकाणी शिप्ट करावे, रेकॉर्डच्या सुरक्षेसाठी सुसज्ज डिझीटल रूम तयार करावी, कर्मचाऱ्यांच्या व नागरीकांच्या सुरक्षीततेसाठी ही इमारत बंद करण्यात यावी, अशी मागणी चिखली शहर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल सवडतकर यांनी केली आहे. जीर्ण झालेली ही इमारत वापरात असल्याने याला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, तसेच नव्या इमारतीची योजना राबवावी, असेही राहुल सवडतकर यांनी सांगितले.
