यादव ट्रेडर्सचा स्तुत्य उपक्रम
नितीन फुलझाडेचिखली:- प्रार्थना करणाऱ्या हजारो हातांपेक्षा मदतीचा एक हात नेहमीच श्रेष्ठ ठरला आहे. आपण ज्या समाजामध्ये राहतो त्या समाजाचे काहीतरी देणे लागतो ही जाणीव ठेवून शहरातील प्रतिष्ठित व्यापारी यादव ट्रेडर्सचे संचालक एकनाथ रामभाऊ यादव यांचेकडून समाज ऋणातून मुक्त होण्याच्या दृष्टीने दरवर्षी आपल्या वडिलांच्या स्मृती प्रित्यर्थ गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण स्व. रामभाऊ ज्योतिबा यादव बहुउद्देशीय संस्था आणि यादव ट्रेडर्स यांच्या संयुक्त विद्यमानाने केले जाते. याही वर्षी ग्रामीण तसेच शहरी शाळांमध्ये सुमारे 5000 लेटर बुक्स,शैक्षणिक साहित्याचे वितरण केल्या गेले.
आदर्श विद्यालयाचे प्राचार्य सतीश गव्हले सर यांच्या अध्यक्षतेखाली विद्यालयातील शंभर विद्यार्थ्यांना पाचशे लेटर बुक्स चे वितरण केल्या गेले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून दाते एकनाथ रामभाऊ यादव यांनी शिक्षण विषय मोलाचे विचार विद्यार्थ्यांसमोर मांडले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य गव्हले सर यांनी विद्यार्थ्यांना उपलब्ध शैक्षणिक साहित्यातून आपली शैक्षणिक प्रगती करून घ्यावी आणि "देणाराने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता घेणाऱ्याने एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे'' या उक्तीप्रमाणे मोठे झाल्यानंतर आपणही समाज बांधवांची अशाच पद्धतीने मदत करावी असे आवाहन देखील केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेवाळे सर तर आभार प्रदर्शन म्हस्के सर यांनी केले.
