नितीन फुलझाडे
चिखली: शहरातील साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याच्या बाजूला साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचे प्रवेशद्वार करण्यात यावे अशी मागणी रिपब्लिकन सेनेच्या वतीने चिखली नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन दि. 8 जुलै 2025 रोजी करण्यात आली.
साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांनी महाराष्ट्राला दिलेले साहित्य खूप अफाट आणि अद्भुत आहे, त्यांनी फक्त साहित्य चळवळच चालवली नाही तर शोषित वंचित आणि दलितांसाठी काम केले. संयुक्त महाराष्ट्र चळवळीसाठी त्यांचे खूप मोठे योगदान आहे. त्यांची माणूस ही कादंबरी जगण्याचा मार्ग शिकवते,त्या काळातलं वास्तव मांडते. अण्णाभाऊ यांनी समाजाला, महाराष्ट्राला दिशा दाखवण्याचे काम केले. त्यांनी लावण्या, छक्कड, कविता, गाणे, कादंबरी यातून प्रचंड समाजप्रबोधन केले.विशेष म्हणजे त्यांच्या स्वतःचा जीवनप्रवास हा अत्यंत अडचणीचा होता. पण त्यावर मार्ग काढत त्यांनी समाजासाठी काम केले. अण्णाभाऊ साठे यांना लोकशाहीर ही उपाधी सहज मिळालेली नाही त्यांना आपल्या साहित्यातून महाराष्ट्राला दिशा दाखवली.ते महान साहित्तिक होते.महान पुरुष साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे प्रवेशद्वार बांधकाम साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याच्या बाजूला करण्यात यावे. चिखली शहरांमध्ये हायवे रोड, खामगाव चौफुली आणि चिखली शहरांमध्ये प्रत्येक वार्डात प्रवेशद्वार तयार करण्यात आले आहे आणि साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या नावाचे प्रवेशद्वार आत्तापर्यंत तयार करण्यात आले नाही. मागील निवेदन रिपब्लिकन सेनेच्या वतीने देऊन सुद्धा आज एक वर्ष पूर्ण झाले आहे तरी नगरपालिकेने साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या प्रवेश द्वाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करताना दिसते. साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याजवळ प्रवेशद्वार येत्या आठ दिवसाच्या आत तयार करण्यात यावे, अन्यथा रिपब्लिकन सेनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा रिपब्लिकन सेनेचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष भाई विजयकांत गवई यांनी ऐका निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदन देतेवेळी रिपब्लिकन सेनेचे ब्रह्माभाऊ साळवे, सलीमभाई, सतीश पवार, विकी निकाळजे, सौरभ बावस्कर, विशाल काकफळे, नागेश अंभोरे, स्वराज क्षीरसागर, देवानंद चांदणे, निलेश अंभोरे, अकित गवई, अमोल काकफळे, संतोष बावस्कर यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
