शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर पक्षप्रवेश.....
नितीन फुलझाडे
चिखली: दिनांक 20 जुलै रोजी वसीम खान सलीम खान यांनी जिल्ह्याचे कार्यध्यक्ष शंतनु भारतभाऊ बोंद्रे यांच्या नेतृत्वामध्ये शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला.वसीम खान यांची चिखली राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.येत्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संपूर्ण ताकदीने समोर जाईल व शहर व ग्रामीण भागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संघटना अधिक मजबूत करेल असा विश्वास या प्रसंगी बोंद्रे यांनी व्यक्त केला. या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमांमध्ये शाहरुख सौदागर,मजार शेख,रेहान शेख,जुनैद मिर्झा,शोएब मणियार,सोनू शेख,समीर शेख,नदीम खान,फहीम खान यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्याचे कार्याध्यक्ष शंतनु भारतभाऊ बोंद्रे, जिल्ह्याचे उपाध्यक्ष मनोज दांडगे,जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष मनीष बोरकर, प्रशांत एकडे,तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष रुपेश रिंढे यांचे सह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
