वडिलांच्या वर्षश्राध्दनिमित्त दिला वृक्षारोपनाचा संदेश




नितीन फुलझाडे

*चिखली :  चिखली तालुक्यातील पाटोदा परिसर तसेच पंचक्रोशीत आपल्या सामाजिक कार्यासाठी प्रसिद्ध व्यक्तिमत्व असलेले स्व. सुखदेवराव नामदेवराव बागुल यांच्या वर्षश्राद्ध कार्यक्रमानिमित्त त्यांचे चिरंजीव बाळकृष्ण सुखदेव बागुल यांनी आज दिनांक 30 जुन रोजी पाटोदा येथिल हिंदू स्मशानभूमीत वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करुन झाडे लावा झाडे जगवा असा संदेश देत वड, पिंपळ, चिंच अशा देशी वृक्षांचे वृक्षारोपन केले.*

  *स्व. सुखदेवराव बागुल हे सामान्य शेतकरी कुटुंबातून आलेले व्यक्तिमत्व होते. तसेच आणीबाणीच्या काळात व्यक्ती स्वातंत्र्यावर तत्कालीन सरकारने गदा आणली होती. त्यावेळी झालेल्या आंदोलनात स्व.सुखदेवराव बागुल यांनी सक्रिय सहभाग घेऊन तत्कालीन सरकारला नमते केले होते. याची दखल सुद्धा भारतीय जनता पक्षाने घेऊन त्यांना सन्मानित केले होते. बेसुमार वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा ढासाळलेला समतोल मिटवायचा असेल तर निसर्ग संगोपन व संवर्धन व वृक्षारोपण ही काळाची गरज आहे. वडिलांच्या वर्षश्राद्ध कार्यक्रमाला फाटा देत त्यांचे चिरंजीव बाळकृष्ण बागुल यांनी आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत वृक्षारोपनासारख्या राष्ट्रीय कार्यात आपलाही सहभाग असावा म्हणून विविध देशी वृक्षांची लागवड करून समाजाला व येणार्‍या पिढीला एक प्रकारे नवीन संदेश दिला आहे. 

  या वृक्षारोपण कार्यक्रमासाठी पाटोदा गावचे सरपंच प्रदीप सोळंकी, माजी सरपंच गजानन लालसिंग सोळंकी, सामाजिक कार्यकर्ते जगन्नाथ नारायण सोळंकी, सखाराम वैद्य, अनिल सोळंकी, राहुल सोळंकी, पुंजाजी सोळंकी, दगडूबा बागुल, गजानन बागुल, किशोर बागुल, रामेश्वर बागुल, तुळशीदास बागुल, रामदास सोळंकी, अक्षय पवार, श्रीकिसन सोळंकी, शुभम बागुल, विनायक बागुल,मंगला वैद्य, शोभा बागुल,संगीता बागुल, सुनीता बागुल, लीलाबाई बागुल, पल्लवी बागुल, स्वाती बागुल, नारायण वैद्य, विकास गवई संदीप गुंजाळकर यांच्यासह परिसरातील बागुल परिवार आणि गावकरी मंडळी, स्वाप्तानंद नगर पाटोदा येथिल नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post Next Post