विठुराया...बळीराजा सुखी होऊ दे, सर्वांना समृद्धी मिळू दे!... आ. सौ. श्वेताताई महाले

 

आ. सौ. श्वेताताई महाले आणि मतदारसंघातील कुटुंब पंढरपूरला विठुराया चरणी...


सदा माझे डोळा,जडो तुझी मूर्ती, रखुमाईच्या पती सोयरिया।
गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्वकाळ!

विठ्ठलाप्रतीची भक्ती, त्याच्या दर्शनाची ओढ आणि त्याच्या कृपेसाठीची याचना ही विठ्ठलभाक्तिची आस वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत असणाऱ्या पांडुरंगाच्या परम पावन वास्तव्याने पुनीत झालेल्या पंढरपूरला आपोआप घेऊन जाते.

आषाढी वारी सोहळ्यानिमित्त गावोगावचे हरिभक्त पंढरीची वाट चालत असून आज विठूरायाच्या ओढीने भक्तांचे माहेर पंढरपूर येथे आ. सौ. श्वेताताई महाले यांनी सहकुटुंब सावळ्या परब्रह्माचे मनोभावे दर्शन घेतले. पंढरीत अवघा भवताप निवारतो या संतवचनाची प्रचिती येते. परमात्मा पांडुरंगाच्या भेटीने हृदयात जागणारा भक्तिभाव अवर्णनीय आहे.असे सौ. श्वेता महाले म्हणाल्या.

या भेटीनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने श्री विठोबा-रखुमाईची सुंदर मूर्ती देऊन आ. सौ. श्वेताताई महाले व श्री. विद्याधरजी महाले( खासगी सचिव, मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र ) यांचा सत्कार व स्वागत करण्यात आले.

चिखली मतदारसंघासह महाराष्ट्रातील बळीराजा सुखी होऊ दे, वारकरी भाविकांच्या मनोकामना पूर्ण होऊ देत, मातृशक्तीला सुरक्षितता, समृद्धी मिळू देत, हि विठुराया चरणी प्रार्थना केल्याचे आ. सौ. श्वेताताई महाले म्हणाल्या.

ज्ञानदेवा गोडी, केली संसारा फुगडी!

असे म्हणत विठूनामाचा गजर करत पंढरीच्या दिशेने जाणार्‍या श्री धारेश्वर संस्थान, म्हसला या चिखली मतदारसंघातील वारकरी बांधवांच्या दिंडीचा मुक्काम आज फलटण येथे होता. या दिंडीला भेट देऊन भाविक भक्तांसोबत भोजन करण्याचा योग लाभला. तसेच वारीत सहभागी महिला भगिनींसोबत फुगडी खेळण्याचा आनंद लुटला. 



संत ज्ञानोबारायांनीही एका अभंगात फुगडीचा उल्लेख केला आहे. वारीदरम्यान अनेक प्रकारच्या फुगड्या आणि विविध खेळ वारकरी खेळतात. त्यातून मिळणारी ऊर्जा घेऊन पंढरीची वाटचाल करतात. वारीतील या वैष्णवांची पायधूळ लाभणे हे माझे भाग्यच आहे.असे आ. सौ. श्वेताताई महाले म्हणाल्या. धारेश्वर संस्थान येथील दिंडी सोबतच वारकरी सांप्रदायिक दिंडी सोहळा, पेठ,तालुका चिखली व वारकरी सांप्रदायिक दिंडी सोहळा,धाड येथील दिंड्यांनाही भेट देऊन दर्शन घेण्याचा मोह आमदार पाटील यांना आवरता आला नाही.

या वेळी ह.भ.प. श्री. लक्ष्मण महाराज सोळंकी, सहदेव बुवा परिहार, युवा कीर्तनकार श्री. सागर महाराज भोंडे, श्री. संजय महाराज खरात, श्री. राजू महाराज भोंडे, श्री. ऋषिकेश महाराज महाले, श्री. यश महाराज खंदारे, श्री. वेदांत महाराज सोळंकी, श्री. शिवनारायण बुवा भंदर्गे, श्री. शिवाभाऊ सोळंकी, श्री. दामू अण्णा उबाळे आदी मान्यवरांची या या दिंड्यांच्या भेटीदरम्यान उपस्थिती होती.

यावेळी ह.भ.प. प्रकाश महाराज जवंजाळ, पंडितदादा देशमुख, देविदास पाटील जाधव, सुहास शेटे, कमलकिशोर लांडगे,अंकुशराव पाटील, ॲड ए. टी. देशमुख,रघुनाथ पवळ, सुरेश इंगळे पाटील, डॉ राजेश्वर उबरहंडे, योगेश राजपूत ,अमोल साठे, डॉ कृष्णकुमार सपकाळ, विष्णू पाटील वाघ, विशाल विसपुते, प्रदीप टाकसाळ, गणेश बाजी,तेजराव पाटील, बंडू अंभोरे तालुका अध्यक्ष युवा मोर्चा, रमेश अकाळ, बळीराम काळे , आकाश काळे,, प्रशांत देशमुख,राम बोधेकर, अनंता सुरडकर,रमेश वाघमारे,विष्णू श्रीकृष्ण वाघ, जानराव सखाराम वाघ, विष्णू पाटील उगले,निलेश भगवान वाघ,प्रमोद पाटील वाघ,कैलास पाटील उबाळे,सोनू तायडे,सुभाष पाटील वाघ,प्रणव विष्णू वाघ,पवन कळसकर,विजय नकवाल,दत्ता सुसर,संजय आतार, सुभाषआप्पा झगडे,दिगंबर भाऊ राऊत,शिवनारायण भाऊ नकोद,गजानन भाऊ रसाळ,देवानंद पठाडे,उद्धव घगे,संतोष भाऊ पाटील,पुरुषोत्तम अवचार,गजानन राऊत,दत्तात्रय नकोद,शिवाजी गव्हाणे,गोलू ओवाळकर,धीरज उनोने इत्यादी मंडळी सोबत होती.
Previous Post Next Post