काँग्रेस कार्यकर्त्यांचा एकजुटीचा निर्धार पक्ष वाढीस चालना देणारा : राहुल भाऊ बोंद्रे
चिखली : स्वातंत्रपूर्व काळापासून ते आजतागायत काँग्रेस पक्षाने देशाच्या विकासासाठी योगदान दिले आहे. स्वातंत्र्य चळवळीत काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांनी जीवाचे बलिदान दिले. काँग्रेस विचारधारेचा हाच वारसा आपल्याला लोकशाहीत पुढे चालवायचा आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस कार्यकर्त्यांचा एकजुटीचा निर्धार पक्षवाढीस चालना देणारा असल्याचे प्रतिपादन जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा चिखली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राहुल भाऊ बोंद्रे यांनी केले.
चिखली तालुका काँग्रेसध्यक्षपदी रामभाऊ जाधव तर शहराध्यक्षपदी राहुल सवडतकर यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली. शुक्रवार 27 जून रोजी चिखली येथे आयोजित सत्कार समारंभामध्ये राहुल भाऊ बोंद्रे बोलत होते. दरम्यान विधानसभा समन्वयक पदी प्रा. राजू गवई यांची नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.पुढे बोलताना राहुल भाऊ म्हणाले की, चिखली शहर व तालुक्यातील काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी नव्या नियुक्त्या करण्यात आल्या असून चिखली तालुकाध्यक्षपदी रामभाऊ जाधव तर चिखली शहराध्यक्षपदी राहुल सवडतकर यांची अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे. माजी तालुकाध्यक्ष समाधानभाऊ सुपेकर व माजी शहराध्यक्ष अतहर काझी यांची कारकीर्द दखलपात्र राहिली असून नवनियुक्त तालुकाध्यक्ष तसेच शहराध्यक्ष यांची नियुक्तीही काँग्रेस पक्षाला नवी ऊर्जा व नव्या दिशा दाखवणारी ठरेल, असा विश्वासही राहुल भाऊ बोंद्रे यांनी व्यक्त केला. यावेळी नियुक्तीचे पत्र देऊन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.आ.राहुलभाऊ बोंद्रे
यांच्यासह नवनिर्वाचित अध्यक्ष रामभाऊ जाधव, राहुल सवडतकर, माजी अध्यक्ष समाधान भाऊ सुपेकर, अतरोधीन काजी, हाजी दादुशेठ, दीपक देशमाने,डॉक्टर मोहम्मद इसरार, कुणाल बोंद्रे, सचिन बोंद्रे, प्राध्यापक निलेश गावंडे सर, प्राध्यापक राजु गवई सर , सभापती डॉक्टर संतोष वानखेडे, नंदूभाऊ सवडतकर, श्याम पठाडे, डॉक्टर सत्येंद्र भुसारी, रिकी काकडे,ईश्वर इंगळे, बिदुसिंग इंगळे, सतीश शिंदे, शहीजादअली खान, विजय गाडेकर विलास कंटुले, राजू राज्याक, गोकुळ शिंगणे, गोपाल देव्हडे, जय बोंद्रे शिवराज पाटील, समाधान गीते, शेषराव अंभोरे, सिद्धेश्वर परिहार, आत्माराम देशमाने, अशोक झगरे, विठ्ठल इंगळे, जाकिरभाई, व्यंकटेश रिंढे, विकास अंभोरे, नागेश अंभोरे, शुभम बुरकुल, भास्कर चांदोरे, सचिन शेटे, कापडसिंगद् पाटील,अरिफ बागवान, कैलास गायकवाड, विशाल गायकवाड, दत्ता करवंदे,गयास बागवान,समाधान आकाळ,गणेश जंजाळ,विजय जागृत, प्रकाश सपकाळ, अदनान खान,अनंता जाधव,संजू नाना सोळंकी, राजू सुरडकर, बाळू साळुंख,कोलारा महाराज, विठ्ठल इंगळे, विशाल सपकाळ, नईम भाई, अकील ड्रायव्हर, शिवा म्हस्के, प्रदीप हाके, जक्का भाई, गुलाब भाई एकलरा, शेख आज्ज, शकील भाई, समाधान सोळंकी, भारत मुलचंदनी, रोहन पाटील, बब्ब्लू शेख, समाधान म्हसके, लक्ष्मन भिसे, यांच्यासह असख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
लोकशाही मूल्ये रुजवण्यासाठी कटिबद्ध : रामभाऊ जाधव
गत पंचवीस वर्षापासून काँग्रेस पक्षाची विचारधारा घेऊन काम करत आहे.चिखली विधानसभा मतदारसंघात आता शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे प्रश्न घेऊन नवीन लढा उभारणार आहे. हुकूमशाहीला लोकशाहीने उत्तर देणार आहे. जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल भाऊ बोंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगाने पक्ष संघटनेला व्यापक पातळीवर प्राधान्य देणार असल्याचे तालुका काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त अध्यक्ष रामभाऊ जाधव यांनी सांगितले.
पक्षाची ध्येयधोरणे जनतेपर्यंत पोहोचवणार : राहुल सवडतकर
बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, जनतेचे सच्चे प्रतिनिधी, राहुल भाऊ बोंद्रे यांच्या आशीर्वादातून, त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वातून मला शहरअध्यक्ष पद देण्यात आले. हा क्षण केवळ गौरवाचा नाही, तर एक नव्या संकल्पांचा, नव्या जबाबदाऱ्या पेलण्याचा, पक्षाच्या ध्येयधोरणांना जनतेपर्यंत पोहोचवण्याचा एक पवित्र निर्धार आहे. शहरातील एकही गल्ली अशी राहणार नाही जिथे काँग्रेस पक्षाचा झेंडा पोहोचणार नाही, प्रत्येक नागरिकाला पक्षाच्या विचारसरणीचा अभिमान वाटला पाहिजे, हेच माझे उद्दिष्ट आहे, असे नवनियुक्त शहराध्यक्ष राहुल सवडतकर यांनी सांगितले.