वाढदिवस एका समाजसेवी व्यक्तिमत्त्वाचा

 






(नितीन फुलझाडे)

"नेते बनणं सहज शक्य असतं पण लोकांच्या मनावर राज्य करणं हीच खरी किमया" या किमयागार नेत्याचं नाव म्हणजे मनोज दादा दांडगे......

 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिगरबाज कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे चिखली विधानसभा अध्यक्ष अनेक वर्षापासून वत्सलाबाई दांडगे बहुउद्देशीय संस्था जामठी अंतर्गत ज्ञानदेव बापू दांडगे शैक्षणिक संकुल च्या माध्यमातून प्रभावीपणे शैक्षणिक कार्य करणारे व गोरगरीब जनतेचे कैवारी संघर्ष योद्धा कर्मयोद्धा जनसामान्याची नेते म्हणून ओळख असणारे मनोज भाऊ दांडगे आज यांच्या वाढदिवसानिमित्त एक नजर टाकूया त्यांच्या जिद्दीच्या संघर्षाच्या आणि सेवाभावी कार्याच्या प्रवासावर....
 राजकीय प्रवासाची सुरुवात 
 मनोज दादांचा राजकीय प्रवास एखाद्या चित्रपटासारखा आहे प्रेरणादायी चढ-उतारणी भरलेला आणि थेट जनतेच्या मनाला भिडणारा त्यांनी सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात एका साध्या कार्यकर्त्यांच्या रूपाने मासुर जिल्हा परिषद सर्कल मध्ये 501 कार्यकर्त्यांसह पक्षप्रवेश केला आणि एका साध्या कार्यकर्त्याच्या भूमिकेतून त्यांनी पक्षाचे काम सुरू केलं झोपडपट्टीतील गरिबापासून ते शेतमजुरापर्यंत प्रत्येक घटकात जाऊन संवाद साधने त्यांच्या अडचणी जाणून घेणे हे त्यांच्या स्वभावातच होतं आणि आहे त्यांच्या सहज स्वभावाने आणि कुणालाही सहज उपलब्ध होत असल्याने एक आपसूकच आपलेपणाची भावना प्रत्येक माणसाविषयी त्यांना आहे आणि विविध माणसांना त्यांच्याविषयी आहे यामध्ये दुमत नाही 

                                      ADD....




.............................................................

.................

 सामान्य जनतेच्या प्रश्नासाठी प्रचंड आवाज उठवणारा कार्यकर्ता म्हणून विविध आंदोलन सम्राट म्हणून त्यांची ओळख लवकरच जनतेच्या मनात घर करून गेली लोकसेवेचे बळ लोकसेवा म्हणजे निव्वळ घोषणा नव्हे ती कृतीतून सिद्ध करावी लागते मनोज दादा दांडगे यांनी मासरूळ जिल्हा परिषद सर्कलच्या विविध अंगी प्रश्नावर वेळोवेळी आवाज उठवून मासुर जिल्हा परिषद सर्कलच्या विकासासाठी तसेच सबंध बुलढाणा जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या प्रश्नांसंदर्भात विविध आंदोलने केलेली आहेत आणि लोकांसाठी व त्यांच्या विकासासाठी 24 तास झटणारा नेता म्हणून स्वतःला सिद्ध केल आहे 
 त्यांच्या पुढाकारातून आणि माध्यमातून त्यांच्या कार्यातून खालील महत्त्वपूर्ण गोष्टी निश्चित प्रकारे घडलेल्या आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये गेल्या सात वर्षीय पक्ष प्रवेश करून मासरूळ व धाड जिल्हा परिषद सर्कल मध्ये हजारो कार्यकर्त्यांची फळी निर्माण केली आणि त्यांनी आपलं राजकीय कार्याच्या माध्यमातून मासरूळ सर्कल मध्ये एक वेगळा दबदबा निर्माण केला, प्रत्येक गावात त्यांनी शेकडो कार्यकर्ते जोडले त्यांच्या समस्या जाणून घेतल्या त्यांनी राजकीय कार्य करत असताना सामाजिक सेवा रुग्णसेवा आतापर्यंत त्यांनी जवळपास साडेतीन हजार रुग्णांच्या शस्त्रक्रिया केल्या विविध आरोग्य तपासणी शिबिरे घेतली हजारो चष्म्याचे वाटप केले विविध राजकीय सामाजिक शैक्षणिक अध्यात्मिक कृषी क्षेत्रातील बदल निश्चित प्रकारे त्यांच्या माध्यमातून कार्य झाले आहे 
मासरूळ सर्कल मधील विविध रस्ते डांबरीकरण व्हावे सिमेंट करण त्यांचे व्हावे रस्त्यांची दुरुस्ती व्हावी वेगवेगळ्या आंदोलने केलेली आहेत त्या अनुषंगाने शासनाने त्याची दखल घेऊन एक रस्ते बांधण्याचे काम सुद्धा केलेला आहे.
 युवा उद्योजकांना प्रोत्साहन 
 मनोज भाऊ दांडगे यांनी युवा उद्योजकांना नेहमी मार्गदर्शन शिबिरे युवकांना रोजगार कसा मिळेल यासाठी प्रयत्न स्वतःच्या ज्या वेगवेगळ्या संस्था आहेत त्यामध्ये युवकांना रोजगार देण्याचे काम केले तसेच विविध युवा उद्योजकांना जन्मभूमी अर्बन बँक च्या माध्यमातून अर्थसहाय्य करून त्यांना उद्योग साठी शुभेच्छा आणि त्यांचा उत्साह वाढवावा यासाठी प्रोत्साहन दिले 
 मानवी संवेदना आणि सामाजिक कार्य 
 राजकारणाच्या पलीकडे एक संवेदनशील मन असलेला नेता म्हणून मनोज दादा दांडगे यांची ओळख आहे कोरोना काळात त्यांनी हजारो कुटुंबापर्यंत अन्नधान्य किट औषध ऑक्सिजन सिलेंडर फेस शील वाटप विविध गरजू लोकांना आर्थिक सहाय्य देऊन त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी सुद्धा त्या काळामध्ये घेतली होती आणि आजतागायत ते काम सुरू आहे त्यांनी अनेक अनाथ मुलांसाठी बाहेर वस्तीगृहात प्रवेश मिळून दिले अभ्यास वृत्ती योजना तसेच मासुर जिल्हा परिषद सर्कल मधील गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळे सैनिकांचे मानसन्मान अंध अपंग लोकांची सेवा त्यांचे मानसन्मान विविध वेगवेगळे उपक्रम घेऊन त्यांनी आपले योगदान जपलेले आहे 

 तरुणांसाठी प्रेरणा 

 मनोज दादांचे एक विशेष वैशिष्ट्य म्हणजे युवकांमध्ये प्रेरणा जागवण ते तरुण कार्यकर्त्यांना सतत संधी देतात मार्गदर्शन करतात आणि त्यांना सामाजिक कार्यात सहभागी करून घेतात त्यांनी मासोळी जिल्हा परिषद सर्कल तसेच सबंध जिल्ह्यामध्ये वेगवेगळे अभियान राबवून त्यामध्ये वृक्ष लागवड मोहिमा असतील प्रत्येक तरुणांमध्ये एक चांगला नागरिक म्हणून देशासाठी योगदान दिलं पाहिजे यासाठी काही उपक्रम असतील ते आयोजन आणि नियोजन करण्याचे काम मनोज दादांच्या माध्यमातून घडलेला आहे.

 कुटुंब संस्कार आणि साधेपणा 

 मनोज दादा यांचे व्यक्तिमत्व अतिशय साधा आणि मितभाषी आहे आपल्या कुटुंबात त्यांनी शिस्त संस्कार आणि सेवा यांचा वारसा वडिलांपासून जोपासलेला आहे आई-वडिलांच्या संस्काराचा वसा आणि वारसा निश्चितपणे पुढे नेत आहे. त्यांचं जीवन म्हणजे एक विनम्रपण प्रभावी नेतृत्व त्यांना आयुष्यात कधीच पदाची भाव नव्हती त्यांना हवी होती ती जनतेची साथ आणि आशीर्वाद आणि त्यांना ती भरभरून मिळाली आहे मिळत आहे आणि भविष्यात सुद्धा मिळणार आहे.

 सन्मान आणि गौरव 

 मनोज दादांना त्यांच्या कार्यासाठी आतापर्यंत अनेक सन्मान प्राप्त झाली आहे शासकीय सेवेत असताना त्यांना आदर्श तलाठी पुरस्कार तसेच शासकीय सेवेमध्ये असताना त्यांना तीन वर्ष पटवारी संघटनेचे केंद्रीय अध्यक्षपद मिळाले होते दहा वर्षे बुलढाण्याचे तलाठी संघटनेचे ते अध्यक्ष होते तसेच वेगवेगळे नागरी सत्कार आणि सन्मान निश्चित प्रकारे त्यांना मिळालेले आहेत.

 जनतेशी नातं 
 प्रत्येक नेता हा 100% निवडणुका जिंकण्यासाठी काम करतो यामध्ये तीळ मात्र शंका नाही परंतु मनोज भाऊ दांडगे हे प्रत्येक गोष्ट निवडणुका जिंकण्यासाठी नाही तर माणसं जिंकण्यासाठी काम करतात ही तेवढे सत्य आहे त्यांनी आजवर एकही क्षेत्र असं ठेवलेलं नाही जिथे त्यांची छाया नाही कधी एखाद्या शेतकऱ्याच्या शेतात तर कधी रुग्णालयात एखाद्या गरीबाच्या बेट जवळ हेच त्यांचे वैशिष्ट्य त्यांची भाषा साधी असली तरी विचार ठाम आहेत त्यांचा तत्व आहे काम बोला पाहिजे प्रचार नाही 
 वाढदिवस विशेष शुभेच्छा आज मनोज दादांचा वाढदिवस आहे हा दिवस केवळ एक दिवस नाहीतर त्या नेतृत्वाच्या प्रवासाची उजळणी आहे त्यांचे कार्य त्यांचे जिद्द आणि त्यांचे सच्चे नेतृत्व आजच्या युवा नेत्यांसाठी आदर्श आहे दादा आपल्या कार्यामुळे मासुर जिल्हा परिषद सर्कलचा चेहरा मुळा बदलल्याशिवाय भविष्यामध्ये राहणार नाही आज तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांमुळे पक्ष अधिक बळकट होतो आहे आणि भविष्यात देखील होत राहणार.
 प्रत्येक राजकारणी नेता होतोच असे नाही पण जेव्हा एखादा नेता जनतेच्या हृदयात राहतो तेव्हा तो केवळ एक व्यक्ती राहत नाही तो एक विचार बनतो मनोज दादा दांडगे हे नाव आज मासुर जिल्हा परिषद सर्कल मध्ये फक्त एक व्यक्ती म्हणून नाही तर न्यायाचं सेवाभावाचं आणि नेतृत्वाचे प्रतीक बनला आहे आपल्या कार्यातून त्यांनी सिद्ध केला आहे की राजकारण ही सेवा असलं पाहिजे स्वार्थ नव्हे 
 आदरणीय मनोज दादा दांडगे यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा आपणास उत्तम आरोग्य दीर्घायुष्य आणि यशस्वी भवितव्य लाभो हीच प्रार्थना ....



लेखन

 संतोष वसंतराव डवले सर...

संस्था समन्वयक वत्सलाबाई दांडगे बहुउद्देशीय संस्था जामठी तालुका जिल्हा बुलढाणा तथा प्राचार्य/समन्वयक ज्ञानदेवराव बापू दांडगे शैक्षणिक संकुल धाड तालुका जिल्हा बुलढाणा तथा सकाळ पत्रकार मासरूळ तालुका जिल्हा बुलढाणा


Previous Post Next Post