चिखली येथे परत एकदा गोवंश सदृश्य कातडे जप्त

 



 चिखली पोलिसांची धडक कार्यवाही


चिखली:-  येथील बाबुलॉज चौकात गोवंश सदृश्य कातडे जप्त. दि.१८/६/२०२५ रोजी रात्री १० वा. चिखली शहरातील बाबु लॉज चौकात आरोपी शेख मोईन शेख रशीद रा. वार्ड क्र.६ खरबडी रोड,(मोताळा) बोराखेडी, बुलढाणा हा बोलोरो पिकअप एम एच ३० बीडी  ००४८ मध्ये मागील बाजूस गोवंश जातीच्या जनावरांचे कातडे  एकूण ३५ नग अंदाजे किंमत ३५००/- रु  घेऊन जात असतांनाना निदर्शनास आले असता सदर प्रकरणी ए. एस .आय. राजेंद्र सखाराम काळे पोलीस स्टेशन चिखली यांच्या तक्रारीवरून अपराध क्रमांक ४६५/२०२५ कलम ६ए, ५ब,९ पशुसंरक्षण अधिनियम नुसार गुन्हा दाखल केला.



 घटनास्थळी पशुवैद्यकीय अधिकारी यांनी नमुने पंचासमक्ष सीलबंद केले. बोलोरो पिकप किंमत ३७५०००/- व ३५०० रू चे कातडे असा एकूण ३७८५००/- रू  मुद्देमाल जप्त करण्यात आला. यापूर्वी दिनांक ३/५/२०२५ रोजी सकाळी सकाळी पोलिसांनी बाजूलॉज चौक परिसरात सुमारे ४५ किलो गोवंश सदृश्य मास जप्त केले होते. अशा  घटना सतत यापूर्वी बाबूलॉज परिसरात घडून आल्या आहेत.महाराष्ट्रात गोमांस विक्री आणि बाळगण्यावर बंदी असतांना सर्रासपणे अशा घटना घडत असल्याने पोलीस प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

Previous Post Next Post