विकसित कृषी संकल्प अभियाना अंतर्गत अमडापूर येथे शास्त्रज्ञ्-आमदार- शेतकरी संवाद....
चिखली:-'विकसित भारत' हा संकल्प पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांनी केलेला असून यात युवा, गरीब, महिला व शेतकरी हे चार स्तंभ विकसित करण्याचे उद्दिष्ट आहे. आपला देश कृषिप्रधान असल्याने शेतकरी व शेतीच्या समृद्धीवरच देशाचा विकास अवलंबून आहे. यानुसार शेतकरी या घटकाकडे पेरणीच्या हंगामापूर्वी विशेष लक्ष देण्यासाठी हे अभियान राबवले जात आहे.काळ्या मातीतून अधिक मोती पिकवण्यासाठी ही देशव्यापी मोहीम राबविली जातं आहे. 'विकसित कृषी संकल्प अभियान' समजून घ्या, आत्मसात करा आणि त्यातून सनातन भारताच्या समृद्ध शेतीचा वारसा पुढील पिढीला सुपूर्द करा असे आवाहन आ. सौ. श्वेताताई महाले पाटील यांनी उपस्थित शेतकऱ्यांना केले.
आज चिखली विधानसभा मतदारसंघांमध्ये "विकसित कृषी संकल्प अभियान" अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र बुलढाणा व कृषी विभाग, यांच्या संयुक्त विद्यमाने अमडापूर येथील अमर विद्यालय येथे आयोजित 'शेतकरी संवाद' कार्यक्रमास उपस्थित राहून आ. सौ. श्वेताताई महाले यांनी शेतकरी व शास्त्रज्ञ यांच्याशी संवाद साधला, त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.
विकसित कृषी संकल्प अभियानातुन आधुनिक कृषी तंत्रज्ञान, वातावरणातील बदलानुरूप पिकांचे नवनवीन वाण, रासायनिक खतांचा संतुलित वापर, नैसर्गिक शेतीपध्दती, पिकांच्या उत्पादनवाढीचे सुधारित लागवड तंत्रज्ञान,पशुपालन, मत्स्यपालन, तसेच केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना आणि धोरणांची माहिती पोहोचविणे हा उद्देश आहे.हे अभियान म्हणजे भारत सरकारने कृषी क्षेत्रात क्रांती घडवण्यासाठी आणि शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी सुरू केलेला एक देशव्यापी उपक्रम आहे. या अभियानाचा मुख्य उद्देश "प्रयोगशाळेतून जमिनीवर" (Lab to Land) तंत्रज्ञान पोहोचवणे हा आहे.
कृषि व शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार आणि भारतीय कृषी अनुसंधान परिषद (ICAR) यांच्या संयुक्त विद्यमाने विकसित कृषि संकल्प अभियान - २०२५ हे राष्ट्रीय स्तरावरील अभियान देशभरात राबवले जात आहे. या अभियानांतर्गत आज शास्त्रज्ञ व शेतकरी यांच्यामध्ये संवाद कार्यक्रम आयोजित केला गेला होता याचे उद्घाटन चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेता ताई महाले पाटील यांनी केले.
या अभियानामध्ये प्रयोगशाळेत संशोधन करणार्या शास्त्रज्ञांना खरीप हंगामापूर्वी 15 दिवस आणि रब्बीपूर्वी 15 दिवस शेतकर्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष समस्या समजून घ्याव्या लागणार आहेत आणि त्यावर आधुनिक पद्धतीने उपाययोजना कराव्या लागणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना आधुनिक शेती करताना तज्ञांचा सल्ला अगदी गावापर्यंत व बांधापर्यंत मिळणार आहे.
स्वतंत्र भारताच्या 75 वर्षाच्या इतिहासात "शास्त्रज्ञ व शेतकरी ही दोन विरुद्धार्थी शब्द समजली जातात", परंतु विकसित भारताचे स्वप्न उराशी ठेवून काम करत असलेल्या पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदा "शास्त्रज्ञ हे शेतकऱ्यांचे तज्ञ मार्गदर्शक आहे" या स्वरूपात या विकसित कृषी संकल्प अभियानाची आखणी व अंमलबजावणी केली आहे, ही या देशासाठी अतिशय अभिमानाची बाब आहे असे आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील म्हणाल्या.
अमडापुर येथे संपन्न झालेल्या या कृषी विकास संकल्प अभियान 2025 कार्यक्रमांमध्ये आयसीएआर मधून डॉ. दास, कृषी विज्ञान केंद्र प्रमुख डॉ. झोपे,डॉ. देशमुख, डॉ. तिजारे,तालुका कृषी अधिकारी डॉ. कंकाळ,अमडापूर भाजप मंडळ अध्यक्ष अमोल साठे, श्रीमती माळोदे, एकनाथ जाधव, प्रसाद देशमुख, अजय देशमुख व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने हजर होते.

