शेत रस्ते तत्काळ मोकळे करुन द्यावे महसूल प्रशासनाला दिले आदेश
मेहकर/प्रतिनिधी
शेत रस्ते हे शेतीसाठी अत्यंत आवश्यक असतात.ते शेतीमाल बाजारपेठेत पोहोचवण्यासाठी आणि शेतीसाठी लागणारी यंत्रसामग्री शेतापर्यंत नेण्यासाठी महत्त्वाचे ठरतात.तसेच,शेतकरी आपल्या शेतामध्ये सहजपणे ये-जा करू शकतात, ज्यामुळे शेतीचे कामकाज सोपे व्हावे म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मेहकर मतदार संघाचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी
आज दिनांक 6 जून 2025 रोजी मेहकर येथील हॉटेल के व्हि प्राईड येथे शेत रस्ते,पांदन रस्त्याचा विकास आराखडा बैठक घेतली या संदर्भात मेहकर लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांच्या रस्त्याच्या आढावा घेण्यात आला. शेतकऱ्यांच्या तक्रारी जाणून घेतल्या आधुनिक शेती साठी शेतरस्ते फार आवश्यक आहे. हार्वेस्टरसह पेरणी,नांगरणी साठी ट्रॅक्टर सारखी वाहने शेतात जाने गरजेचे आहे. त्या साठी पूरक कृती आराखडा तयार करण्याच्या संदर्भात तसीलदार व गटविकास अधिकारी यांना आदेश देण्यात आले. आलेल्या तक्रारींचा आठ दिवसाच्या आत निपटारा करावा अशाही सूचना आमदार खरात यांनी या वेळी महसूल व भूमिअभिलेख अधिकारी यांना दिल्या.
यावेळी तहसीलदार नीलेश मडके, मेहकर गटविकास अधिकारी डी बी खरात, लोणार बीडीओ डॉ उमेश देशमुख, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस शामभाऊ उमाळकर,शिवसेना उप जिल्हा प्रमुख आशिष रहाटे, जिल्हा संघटक गोपाल बच्छिरे,राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भास्करराव काळे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मेहकर शहर प्रमुख किशोर गरोळे, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष दत्ता पाटील घनवट, तालुका अध्यक्ष काँग्रेस देवानंद पवार, जि. प. सदस्य संजय वडतकर, माजी नगराध्यक्ष लोणार साहेबराव पाटोळे,प्रा. गजानन खरात, ऍड. आकाश घोडे युवा सेना तालुका प्रमुख, लोणार तालूका प्रमुख जीवन घायाळ, महिला आघाडीच्या लोणार तालुका प्रमुख, तारामती जायभाये, यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व मोठ्या संख्येने शेतकरी उपस्तिथ होते.