नितीन फुलझाडे
 *जिल्हाभरातील पदाधिकार्यांच्या कामाचा घेतला आढावा* 
चिखली:- राधाबाई खेडेकर विद्यालयाच्या सभागृहामद्ये बुधवारी १८ जुन रोजी संभाजी ब्रिगेडची आढावा बैठक संपन्न झाली.संभाजी ब्रिगेडच्या पुर्वीच्या कार्यकारीण्या विसर्जीत करुन प्रत्येक जिल्ह्यामद्ये नविन पदाधिकारी नियुक्तीसाठी अध्यक्ष मनोज आखरे यांच्या सुचनेप्रमाणे सदर बैठकीमद्ये संभाजी ब्रिगेडच्या जिल्हाभरातील पदाधिकार्यांच्या कार्याचा अहवाल केंद्रीय निरिक्षक समितीपुढे सादर केला.या समिती मद्ये केंद्रीय निरिक्षक म्हणुन संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष सुधिर देशमुख तसेच विभागीय अध्यक्ष गजानन भोयर हे उपस्थित होते.यावेळी समितीने बुलढाणा जिल्ह्यातील सर्वच पदाधिकार्यांचा आजवरचा कार्य अहवालाचा आढावा घेतला.यामद्ये दक्षिणचे यापुर्वीचे जिल्हाध्यक्ष योगेश्वर निकस यांनी आजवरच्या प्रगतीवर भाष्य केले.तर जिल्हासचिव मदन दहातोंडे यांनीही जिल्ह्याच्या आजवरच्या संघटनाच्या परिस्थितीविषयी विचार व्यक्त केले.त्यानंतर जिल्हाकार्याध्यक्ष पांडुरंग पाटील यांनी त्यांच्या आजवरच्या कामाचा, आंदोलनांचा व संघटनात्मक बांधनीचा विस्तृत अहवाल सादर केला.याबद्दल केंद्रीय निरिक्षकांनी पाटील यांचे विषेश कौतुक केले.अशाप्रकारे जिल्हाध्यक्ष पदासाठी तीन इच्छुकांची नावे समितीपुढे आली यामद्ये पांडुरंग पाटील,योगेश्वर निकस व मदन दहातोंडे यांचा सामावेश आहे.लवकरच नविन नियुक्त्या जाहीर केल्या जातील असे सुधिर देशमुख यांनी सांगितले.यावेळी मराठा सेवा संघ माजी जिल्हाध्यक्ष समाधान शिंदे,जेष्ठ मार्गदर्शक राजेंद्र पवार, मेहकर संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष धनंजय बुरकुल,तालुकाकार्याध्यक्ष नितीन वैराळ,सोशल मीडिया जिल्हाप्रमुख सुनिल वाघमारे, चिखली तालुकाध्यक्ष संजय अंभोरे,शहराध्यक्ष मंगेश भोलवनकर,मेहकर तालुकाकार्यकारीनी सदस्य गजानन पवार,प्रशांत इंगळे,विकास तेजनकर, संदीप कानोडजे,गजानन लोंढे, धनंजय वैराळ, सरपंच सोपान जाधव,धिरज वैराळ, उपसरपंच राजु लांभाडे, पंजाब पवार आंदींसहीत शेकडो कार्यकर्ते उपस्थितीत होते.
