चिखली:
26 जून स्थानिक आदर्श विद्यालय चिखली येथे प्राचार्य श्री सतीश गव्हले सर यांच्या अध्यक्षतेखाली व चिखली पोलीस स्टेशन चे कर्तव्य दक्ष ठाणेदार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी स्टेशनचे
शरदजी भागवतकर पोलीस उपनिरीक्षक, संतोषजी जाधव, पोलीस उपनिरीक्षक.शिंदे साहेब, किटे साहेब, नेवरे साहेब उपप्राचार्य, भगवान आरसोडे सर..
प्रथम लोकराजा राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून विद्यार्थ्यांना भागवतकर साहेब व जाधव साहेब यांनी राजर्षी शाहू महाराज, यांच्या जीवनपटावर प्रकाश टाकत अमलीपदार्था चे लागणारे व्यसन व त्यापासून दूर राहण्याचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना दिले.
कार्यक्रमाचे संचलन गणेश अंभोरे यांनी केले, कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुधीर शेटे सर, अमित कुहिरे सर, विनायक गिऱ्हे सर, तथा सर्व शिक्षक प्राध्यापक, शिक्षक कर्मचारी बंधू भगिनींनी प्रयत्न केले...
