नितीन फुलझाडे
चिखली:
दि. २६ जून रोजी आदर्श विद्यालयात राजर्षी शाहू महाराज यांची जयंती विद्यालयाचे प्राचार्य सतीश गव्हले यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात साजरी करण्यात आली. उपमुख्याध्यापक आरसोडे सर , पर्यवेक्षक तायडे सर, दंडे सर, श्री. शेटे सर, जाधव भाऊ यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन केले .
या प्रसंगी कु. सृष्टी जाधव, कु. श्रावणी काळे , कु . खुशी रिंढे, ऋषिकेश वायाळ , रुद्र पेटकर विद्यार्थांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवन कार्याविषयी माहिती दिली. तसेच मुख्याध्यापक यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये
राजर्षी शाहू महाराज यांनी केलेल्या समाज सुधारणा विषयक कार्याची माहिती दिली.
कार्यक्रमाचे सूत्र संचलन कु. धनश्री पाटील आणि कु. खुशी रिंढे यांनी केले तर आभार प्रदर्शन कु. गौरी नागरे हिने केले.
कार्यक्रमाचे संयोजन सुधीर शेटे सर,अंभोरे सर आणि कुहिरे सर यांनी केले सदर कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने विद्यालयातील सर्व शिक्षक प्राध्यापक कर्मचारी बंधू-भगिनी आणि विद्यार्थी उपस्थित होते.