प्रति -
अखिल भारतीय माळी महासंघ ही भारतातील माळी समाजाची एक प्रमुख सामाजिक संघटना आहे. ही संघटना माळी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि उत्थानासाठी कार्यरत आहे.सामाजिक एकता आणि सहकार्य करून समाजात परस्परांमध्ये सहकार्य, प्रेम, जिव्हाळा, आत्मीयता आणि बंधुत्वाची भावना निर्माण करीत सामाजिक जागृती आणि विकास: माळी समाजाला संघटित करण्याचे काम माळी महासंघामध्ये चालते. या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष शंकरराव लिंगे यांची महात्मा फुले समता परिषदेच्या उपाध्यक्षपदी निवड झाली असून गत काही दिवसांपूर्वी अ.भा. माळी महासंघाच्या बुलढाणा जिल्हाध्यक्षपदी विजय खरात यांची सुद्धा नियुक्ती करण्यात आली त्यामुळे अखिल भारतीय माळी चिखली यांचे वतीने चिखली शहरातील श्री संत सावता माळी भवन येथे दिनांक २२ जून 2025 रोजी दोन्ही मान्यवरांचा समाज बांधवांच्या उपस्थितीत सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.
सदरचे आयोजित कार्यक्रमांमध्ये सत्कारमूर्ती म्हणून अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा नवनियुक्त महात्मा फुले समता परिषदेचे उपाध्यक्ष शंकरराव लिंगे व अ.भा. माळी महासंघाचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष विजय खरात यांचा समाज बांधवांच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मधुकर धिरके यांनी स्थान स्वीकारले तर प्रमुख उपस्थितीमध्ये प्रदेशाध्यक्ष गौतम क्षीरसागर , राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा विश्वस्त रमेश हिरळकार, राष्ट्रीय उपाध्यक्ष आबासाहेब तोडकर, माजी नगराध्यक्ष राजाभाऊ खरात समता परिषद नेते दत्ताभाऊ खरात ,श्रीराम भाऊ झोरे, विलास घोलप, प्रकाश सपकाळ, सूर्यकांत मेहेत्रे, आसलगाव सरपंच प्रकाश इंगळे यांचा अन्य मान्यवर उपस्थित होते.
सदरचे कार्यक्रमादरम्यान बुलढाणा अखिल भारतीय माळी महासंघाची नवीन जिल्हा कार्यकारणी घोषित करण्यात आली. त्यामध्ये चिखली तालुका अध्यक्ष जनार्दन सपकाळ, मेहकर तालुकाध्यक्ष अमोल मगर, चिखली शहर अध्यक्ष पत्रकार मोहन मेहेत्रे, राज्य कार्यकारणी सदस्य केशवराव सोनुने, जिल्हा उपाध्यक्ष मधुकरराव घीरके, जिल्हा सचिव दीपक नन्हई , जिल्हा उपाध्यक्ष संजय कानकटाव , जिल्हा किसान आघाडी उत्तमराव परमाळे, जिल्हा प्रसिद्ध प्रमुख पत्रकार नितीन फुलझाडे तालुका प्रसिद्धीप्रमुख अंकुश अवचार, चिखली शहर प्रसिद्ध प्रमुख ज्येष्ठ पत्रकार कृष्णराव कुडके, डॉक्टर सेल प्रमुख गजानन अजगर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी उत्कृष्ट प्रकारचे नियोजन अभय तायडे, राजेश मेहत्रे, रामभाऊ अवचार, गजानन गाभणे सर, राजेश जुमडे, डॉ. अजय अवचार यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक नन्हई सर यांनी तर सूत्रसंचालन केशव भराड सर यांनी केले होते.
