*आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यासह कर्मचारी व सफाई कामगार करत आहेत श्रमदान*
*नितीन फुलझाडे*
*चिखली:- स्वच्छ चिखली सुंदर चिखली याला जोड देत नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक प्रशांत बिडगर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाचे अधिकारी कर्मचारी यांनी शहरातील विविध स्मशानभूमीत जाऊन स्वच्छता मोहीम सुरू केली आहे. यामध्ये झाडूसफाई, गवत काढणे, कचरा उचलणे इत्यादी उपक्रम राबविण्यात येत आहेत. सदर काम हे शहरातील स्वच्छतेसह अतिरिक्त श्रमदान म्हणून कार्यालयीन वेळे व्यतिरिक्त कर्मचाऱ्यांकडून केल्या जात आहे हे विशेष*
*या स्मशानभूमी स्वच्छता मोहिमेमध्ये शहरातील विविध ठिकाणच्या स्मशानभूमीमध्ये कर्मचारी सकाळी जाऊन श्रमदान करीत आहेत. यामध्ये नगरपरिषद चिखलीचे आरोग्य निरीक्षक दिलीप इंगळे, रितिक खरे, संजय गिरी, मुकादम राजेश साळवे, सुरेश भंडारे रोहित नकवाल व इतर सफाई कामगार भाग घेत आहेत.*
