शिवाजी विद्यालयामध्ये गुणवंतांचा सत्कार व भावी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा!



नितीन फुलझाडे 

भविष्यातही उत्तुंग यश मिळवा!.... आ. सौ. श्वेताताई महाले

आज श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, चिखली येथे आयोजित गुणगौरव सोहळा 2025 या कार्यक्रमात सहभागी होऊन गुणवंतांचे कौतुक करण्याचा योग लाभला याचा अत्यंत आनंद आणि अभिमान वाटतो आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचे कौतुक आहेच, भविष्यातही असेच उत्तुंग यश मिळवावे अशा शुभेच्छा या वेळी आ. सौ श्वेताताई महाले यांनी व्यक्त केल्या. 


आजचा हा गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा माझ्यासाठी खूपच खास असल्याचे आ.सौ.महाले म्हणाल्या.

येथे उपस्थित असलेल्या सर्व मान्यवर, शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक स्वागत करून, आपण आपल्या शाळेतील गुणवंतांचा गौरव करण्यासाठी एकत्र आलेलो आहोत.शिवाजी शाळेमध्ये गुणवंतांची परंपरा राहिली आहे, तीच परंपरा संपूर्ण चिखली विधानसभा मतदारसंघांमध्ये या सत्काराच्या रूपाने पाहायला मिळत असल्याचे आमदार सौ श्वेता महाले पाटील म्हणाल्या. 


संपूर्ण चिखली विधानसभा मतदारसंघातून 90% पेक्षा अधिक गुण मिळवलेल्या 400 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचा सत्कार यावेळी आमदार सौ श्वेताताई महाले पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. त्याचप्रमाणे एन एम एस या परीक्षेमध्ये चिखली विधानसभा मतदारसंघातून 56 विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले असून त्यांना जवळजवळ 36  लक्ष रुपये एवढी शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात शिष्यवृत्ती ही राज्य सरकारकडून या गुणवत्तेला दिलेला पुरस्कारच आहे असे आमदार सौ श्वेता ताई महाले पाटील म्हणाल्या.



 मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियाना अंतर्गत चिखली तालुक्यातील सात शाळांना दर्जा व गुणवत्तेसाठी पुरस्कार प्राप्त झाल्याने आमदार सौ महाले यांनी या शाळा व त्यांच्या प्रशासनाचे कौतुक केले. चिखलीतील आदर्श विद्यालय यांनी चिखली तालुक्यातून प्रथम व संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यातून द्वितीय क्रमांक मिळवल्याने त्यांचे विशेष कौतुक आमदार सौ महाले यांनी केले. या अभियानांतर्गत खाजगी व्यवस्थापन असलेल्या तीन शाळा व शासकीय जिल्हा परिषद च्या तीन शाळा अशा सहा शाळांना सुमारे 17 लाख रुपयाचे बक्षीस मिळाल्याने आमदार सौ श्वेता ताई महाले यांनी या शाळांचे कौतुक केले. नवोदय विद्यालयामध्ये चिखली तालुक्यातील नऊ विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार प्रवेश मिळाला त्यांचाही सत्कार आमदार सौ श्वेता ताई महाले पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.


आज आपण आपल्या शाळेत शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करत आहोत. या विद्यार्थ्यांच्या यशाने आपल्याला एक नवीन प्रेरणा मिळते. या विद्यार्थ्यांना त्यांच्या कठोर परिश्रमासाठी आणि समर्पणासाठी मनःपूर्वक अभिनंदन! असे गौरवउदगार आ. सौ श्वेताताई महाले यांनी काढले.


या विद्यार्थ्यांच्या यशाचे कारण म्हणजे त्यांचे अथक परिश्रम आणि शिक्षकांचे मार्गदर्शन. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन केले आणि त्यांना यशाच्या दिशेने चालवले. या विद्यार्थ्यांच्या यशात त्यांच्या आई-वडिलांचाही मोठा वाटा आहे. त्यांनी विद्यार्थ्यांना नेहमीच प्रोत्साहन दिले आणि त्यांच्या स्वप्नांना साथ दिली. आज आपण या विद्यार्थ्यांना गौरवून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊ इच्छितो. आपण त्यांना आपल्या शुभेच्छा आणि आशीर्वाद देऊया, जेणेकरून ते भविष्यातही असेच यश मिळवू शकतील.गुणवंतांना प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित या सोहळ्याने नक्कीच त्यांच्या आत्मविश्वासात भर घातली आहे. असे आ. श्वेताताई महाले म्हणाल्या.


आ. सौ. श्वेताताई महाले गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करत असताना चिखली विधानसभा मतदारसंघातील कव्हळा या गावातील जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या कु. दिक्षा दिलीप इंगळे या मुलीने आ. श्वेताताईचे एक सुंदर पेन्सिल स्केच तयार करून आ. महोदया यांना भेट म्हणून देण्याची इच्छा व्यक्त केली, आणि आ. महोदया यांनिदेखील या चिमुकलीच्या कलेला वाव देण्यासाठी तिच्या हातून स्टेजवर हे स्केच स्वीकारले तसेच तिला शाब्बासकी देखील दिली.या मुलीच्या कला क्षेत्रातील रुचिला वाव  मिळावा आणि आपल्यातून डॉक्टर इंजिनियर वकील त्याचबरोबर कलाकार आणि शिल्पकार देखील घडावे यासाठी सुप्त कलागुण असलेल्या मुलांना आपण सगळ्यांनी आवडत्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी अधिक संधी उपलब्ध करून द्यायला हव्यात असे देखील आ. सौ. श्वेताताई महाले म्हणाल्या.

     

 या समारंभाचे अध्यक्ष श्री. गुलाब खरात (I.A.S.), मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. बुलढाणा होते. प्रमुख पाहुणे म्हणून  मोहन (अति. उपमुख्य कार्यकारी अधिकारी),  आशिष पवार (उपमुख्य कार्यकारी अधिकारी),  अनिल आकाळ (शिक्षणाधिकारी माध्यमिक, बुलढाणा),  विकास पाटील (शिक्षणाधिकारी प्राथमिक, बुलढाणा),  गजानन पोफळे (गट विकास अधिकारी, पं. स. चिखली),  आर. आर. पाटील (गट शिक्षणाधिकारी, पं. स. चिखली),  शंतनू बोंद्रे कार्याध्यक्ष राष्ट्रवादी,  अमोल साठे भाजपा मंडळाध्यक्ष, अनिल जाधव, धाड मंडळाध्यक्ष, पंजाबराव धनवे, वसंतराव गाडेकर गुरुजी आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गट शिक्षण अधिकारी आर आर पाटील तसेच गट समन्वयक प्रवीण वायाळ यांनी विशेष मेहनत घेतली.

Previous Post Next Post