चिखली : - चिखली येथील प्रतिष्ठित व्यापारी, आशिर्वाद मंगल कार्यालयाचे संचालक/मालक तथा जनकल्याण समाज उन्नती पत्रकार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष विजय जगदीश जयस्वाल यांची भारत सरकार मान्यता प्राप्त प्रारंभिक आंतरराष्ट्रीय मानवाधिकार व महीला अपराध नियंत्रण संघटनेच्या बुलढाणा जिल्हा जनसंपर्क अधिकारी म्हणून नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. विजय जयस्वाल यांना व्यवसाय बरोबर समाजसेवा करण्याची देखिल आवड आहे, ते दरवर्षी चिखलीच्या आराध्यदैवत माता रेणुकादेवी यात्रे निमित्त शहरात दाखल झालेल्या भाविक भक्तांना डिपी रोड व्यापारी असोसिएशनच्या माध्यमातून भव्य दिव्य महाप्रसादाचे आयोजन देखिल करत असतात त्याच बरोबर गरिब व गरजुंना योग्य मदत व सल्ला देखिल देत असतात. ते जनकल्याण समाज उन्नती पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष असुन ग्रामीण भागातील प्रिंट मिडिया/इलेक्ट्रॉनिक मिडिया पत्रकारांचे संघटन करुन त्यांचे अडीअडचणी जाणून घेऊन त्यांना योग्य तो सल्ला व मोलाचे मार्गदर्शन करत असतात.पत्रकारांच्या विविध मांगण्या व त्यांना न्याय देण्यासाठी जनकल्याण समाज उन्नती पत्रकार संघटनेच्या माध्यमातून कार्य करीत असतात. अशा विविध सामाजिक कार्यात पुढाकार घेणारे शहरातील प्रतिष्ठित व्यावसायीक विजय जगदीश जयस्वाल यांची भारत सरकार मान्यता प्राप्त प्रारंभिक आंतरराष्ट्रीय मानवाधिकार व महीला अपराध नियंत्रण संघटनेच्या बुलढाणा जिल्हा जनसंपर्क अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्ती बद्दल त्यांचेवर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.