*नितीन फुलझाडे*
शिवाजी अभ्यास शाळा, चिखली येथे भव्य सेवानिवृत्ती व गौरव सोहळा संपन्न
चिखली – श्री शिवाजी अभ्यास शाळा, चिखली येथील मुख्याध्यापिका श्रीमती कमल अशोकराव जेऊघाले या दिनांक ३१ एप्रिल २०२५ रोजी नियमानुसार सेवानिवृत्त झाल्या. त्यांच्या कार्यकाळातील उल्लेखनीय सेवेसाठी त्यांचा ‘गंगाई प्रेरणाशक्ती जीवन गौरव पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात आला. गंगाई बहुउद्देशीय संस्था, चिखली ही संस्था गेल्या १० वर्षांपासून आरोग्य, कृषी, शिक्षण व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून, दरवर्षी विविध क्षेत्रात प्रेरणादायी कार्य करणाऱ्या व्यक्तींना गौरवित करते.
हा भव्य कार्यक्रम शुक्रवार दिनांक ३० एप्रिल २०२५ रोजी सकाळी ११.३० वाजता श्री शिवाजी विद्यालय सभागृह, चिखली येथे पार पडला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. डॉ. पी.एस. वायाळ , प्राचार्य तथा स्वीकृत सदस्य, श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती होते. प्रमुख अतिथी म्हणून मा. सौ. श्वेताताई महाले पाटील (आमदार, चिखली मतदारसंघ) यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून विविध शैक्षणिक, प्रशासकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी आपली उपस्थिती नोंदवली. त्यात –
• मा. श्री. मधुकरराव पाटील व मा. श्री. अशोकराव पाटील (शाळा समिती सदस्य व आजीव सदस्य, श्री.शि.शि.सं. अमरावती)
• मा. श्री. प्रल्हाद वानखेडे (शाखा निरीक्षक, पंचायत समिती, चिखली)
• मा. डॉ. प्रकाश शिंगणे (माजी चाणक्यनगर संपादक)
• मा. श्री. पंकज गवई (श्री.शि.शि.सं., बुलडाणा शाखा तपासणी अधिकारी)
• मा. श्री. बाबासाहेब भोईटे, मा. श्री. सचिनराव राठोड, मा. श्री. दीपक हिंगणे, मा. श्री. बालासाहेब खरात, मा. श्री. संतोषराव बुचके, मा. श्री. शांतनु पाटील, मा. श्री. नरेश कुंडेकर, मा. श्री. आर.आर. पाटील आणि मा. श्री. प्रकाश अंधारे यांचा समावेश होता.
तसेच, प्रमुख उपस्थिती म्हणून मा. डॉ. विनीता पोच्छी मॅडम (प्राचार्य, श्री शिवाजी महाविद्यालय, अमरावती), मा. डॉ. अनंतकुमार चेके (प्राचार्य, श्री शिवाजी विद्यालय), मा. डॉ. निलेश गावंडे (सिनेट सदस्य, संत गाडगेबाबा विद्यापीठ, अमरावती), मा. श्री. पंढरी इंगळे (अध्यक्ष, गंगाई बहुउद्देशीय संस्था), तसेच माजी प्राचार्य मा. आर.आर. माळोदे सर यांची विशेष उपस्थिती होती.
या कार्यक्रमात श्रीमती कमलताई जेऊघाले यांच्या शैक्षणिक योगदानाचे व विद्यार्थ्यांवर केलेल्या प्रभावी कार्याचे कौतुक करण्यात आले. त्यांच्या प्रेरणादायी नेतृत्वामुळे शाळेचा शैक्षणिक दर्जा व शिस्तीचा आदर्श उभा राहिला.
कार्यक्रम प्रंसगी मा आमदार सौ श्वेताताई महाले पाटील यांनी त्यांच्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देत मॅडम च्या कार्याचा गौरव केला. तर शाळा निरीक्षक अंधारे साहेब यांनी मॅडम च्या कार्यकाळात शाळेने काही प्रगती केली याचे त्यांनी स्वतः अनुभवलेले क्षण वर्णन करून मॅडम ने केलेल्या कामाची पावतीच दिली. प्राचार्य डॉ निलेश गावंडे सर यांनी मार्गदर्शन करताना जेऊघाले मॅडम चा आतापर्यंतचा प्रवास उलगडून सांगितला. प्रा.नरेंद्र खेडेकर यांनीसुद्धा अभिनंदनपर शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी डॉ पंढरी इंगळे यांनी सुद्धा शिवाजी अभ्यास शाळेचा कोविड च्या काळात व त्यानंतर सुद्धा झालेला विकास आणि मॅडम ने केलेल्या मेहनतीची दखल घेत त्यांना "गंगाई प्रेरणाशक्ती जीवनगौरव" पुरस्कार देऊन गौरव केला.तर अध्यक्षीय भाषण करताना प्राचार्य डॉ वायाळ सरांनी मॅडम नी आतापर्यंत शाळेत केलेल्या कामाची प्रशंसा केली तसेच निवृत्तीच्या आधी पहिल्या वर्गात 140 ऍडमिशन केल्याबद्दल अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
तर स्वागताला उत्तर देताना जेऊघाले मॅडम यांनी सर्व सहकाऱ्यांचे आभार मानताना सौ लता इंद्रजीत मोरे मॅडम, श्री सुमेध गव्हांदे सर, श्री पवार सर, श्री आटोळे सर,श्री मुळे सर, श्री बरडे सर, सौ. प्रिया देशमुख मॅडम यांनी केलेल्या विशेष सहकार्य व शालेय कामात दिलेल्या योगदानानिमित्त विशेष आभार मानले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अंभोरे मॅडम यांनी केले. व आभार प्रदर्शन आटोळे सरांनी केले.
कार्यक्रमानंतर उपस्थित सर्व मान्यवर व शिक्षकांसाठी स्नेह भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.
कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन श्री शिवाजी अभ्यास शाळेतील सर्व शिक्षक व कर्मचारी वृंद यांनी केले.