नगरपालिका निवडणुकीच्या अगोदरच काँग्रेसला मोठे भगदड....

 



 काँग्रेस नेतृत्वाला कंटाळून माजी नगरपालिका उपाध्यक्ष यांचा जाहीर भाजप प्रवेश....

 सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्याच्या आत घेण्यासाठी राज्य सरकारला सूचित केले आणि राज्यभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी इच्छुक लोकांची एकच धावपळ सुरू झाली.

 बुलढाणा जिल्ह्याच्या राजकारणाचे शक्ती केंद्र मानले जाणाऱ्या चिखली विधानसभा मतदारसंघात देखील आजी माजी आमदार यांची स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये कसोटी लागणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्याची डेडलाईन जाहीर करताच सलग दहा वर्ष चिखली नगरपालिकेचे उपाध्यक्ष राहिलेले अब्दुल रफिक हाजी अब्दुल कादर यांनी काँग्रेस नेतृत्वावर शंका उपस्थित करत व चिखली विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार सौ श्वेता ताई महाले पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला आहे.

 श्री अब्दुल रफिक हाजी अब्दुल कादर हे सलग सहा वेळा चिखली नगरपालिकेचे नगरसेवक म्हणून काँग्रेस पक्षाकडून निवडून आलेले होते. पाच वर्ष नगरपालिकेमध्ये शिक्षण सभापती आणि पाच वर्ष चिखली नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी काम केले आहे. स्थानिक डॉक्टर झाकीर हुसेन उर्दू हायस्कूल चे अध्यक्ष असून चिखलीतील मुस्लिम अल्पसंख्यांक समुदायाचे ते अत्यंत विश्वासू नेते मानले जातात.

 चिखली मध्ये मोठ्या प्रमाणावर सर्व धर्मीय विकास कामे होत असताना काही राजकारणी हे फक्त विकासाच्या आड येण्यासाठी धुर्त राजकारण करत असतात. विचारधारेला विरोध करणे ऐवजी नेहमी विकासाला विरोध करून विधानसभा निवडणुकीच्या वेळेस कट्टर धार्मिकतेला खतपाणी दिल्याने मुस्लिम धर्मियांविषयी समाजात एक कलुषित मत तयार होऊन दोन धर्मामध्ये मोठी दरी निर्माण करण्याचे काम काँग्रेस नेतृत्वाकडून करण्यात आले. अल्पसंख्यांक व अनुसूचित जातीतील लोकांचा फक्त आपल्या स्वार्थी राजकारणासाठी काँग्रेसने उपयोग केला या स्वार्थी राजकारणाला व चांगल्या माणसांना वापरून घेऊन फेकून देण्याच्या प्रवृत्तीला कंटाळून आपण विकास कन्या सौ श्वेता ताई महाले पाटील यांच्या नेतृत्वावर सार्थ विश्वास ठेवून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत आहोत असे श्री अब्दुल रफिक हाजी अब्दुल कादर म्हणाले.

 श्री अब्दुल रफिक आजी अब्दुल कादर यांनी मुंबईमध्ये महसूल मंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते व चिखलीच्या आमदार सौ श्वेता ताई महाले पाटील यांच्या उपस्थितीत तसेच श्री मोहम्मद रशीद मोहम्मद हशम व शेख सलीम शेख अहमद व अन्य कार्यकर्त्यांसमवेत भारतीय जनता पक्ष प्रवेश घेतला. त्यांच्या भाजपा प्रवेशामुळे काँग्रेसच्या गटाला मोठे खिंडार पडले असून आमदार सौ श्वेता ताई महाले पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून रफिक शेठ कुरेशी यांनी भाजपात प्रवेश घेतल्याने अल्पसंख्यांक समुदायाचा देखील भाजपाला वाढता पाठिंबा मिळत असल्याचे दिसून येत आहे.
Previous Post Next Post