उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नेतृत्वात नरहरी गवईंसह शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
नितीन फुलझाडे
मुंबई : मुंबई येथे काल दिनांक ७ मे रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे हस्ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे मा. जिल्हाध्यक्ष तथा मा. जिल्हापरिषद सदस्य,नरहरीदादा गवई यांचा त्यांच्या शेकडो प्रमुख कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर पक्षप्रवेश करण्यात आला.
विधानसभा निवडणुकीपूर्वी नरहरीदादा गवई यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले ) या पक्ष जिल्हाध्यक्ष या पदाचा राजीनामा दिलेला होता. त्यानंतर काल मुंबई देवगिरी बंगला येथे हा पक्ष प्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री आ.मकरंद आबा पाटील,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र राज्य प्रवक्ता महेशजी शिंदेसाहेब , बुलडाणा जिल्हाध्यक्ष ऍड. नाझेर काजी , शंतनू बोन्द्रे, टी. डी. अंभोरे पाटील, व इतर मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी पक्षाचे सर्वेसर्वा मा.अजितदादा पवार यांनी संपूर्ण महाराष्ट्रात व प्रामुख्याने विदर्भात पक्षसंघटन मजबूत करण्याबाबत आपले विचार मांडले व नवीन पक्ष प्रवेश केलेल्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही त्यांना पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी निश्चितच पक्षाचे वतीने बळ देण्यात येईल व योग्यतेनुसार पदे देण्यात येतील तसेच सत्तेत सहभाग सुद्धा देण्यात येईल मान सन्मानाची वागणूक देण्यात येईल असे आश्वासन दिले. यावेळी प्रमुख पक्ष प्रवेश करणारे नरहरीदादा गवई यांनी सुद्धा आपले विचार मांडत मांडत म्हणाले की, चाळीस वर्ष रिपब्लिकन चळवळीत आम्ही काम करीत आहोत, जिल्हापरिषद सदस्य म्हणून निवडून आलो आहे, 2014 ची मेहकर विधानसभा निवडणूक सुद्धा युतीच्या तिकिटावर लढवली आहे त्यात तिसऱ्या क्रमांकाची मते ही आपल्याला मिळाली आहेत. गोरगरीब, शोषित पिडीत बहुजन समाजाला न्याय देण्यासाठी आम्ही आज रोजी अजितदादा पवार यांचे नेतृत्वार विश्वास ठेवून व बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री मा. मकरंद आबा पाटील व बुलडाणा जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष नाझेर काजी तसेच आमदार मनोज कायंदे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली पक्षप्रवेश करीत आहोत असे त्यांनी यावेळी आपल्या भाषणात सांगितले.याप्रसंगी आ.मकरंद आबा पाटील, महेश शिंदे, नाझेर काझी यांनी सुद्धा या कार्यक्रमात आपले विचार मांडले.
या प्रसंगी बाळासाहेब दामोदर, दिलीप वानखेडे ,
आम्रपाल वाघमारे ,शुभम दि. वानखडे , नितीन कांबळे ,भागवत साळवे ,सुरेश खंडारे ,किरण दामोदर ,आकाश हिरोळे , दिपक जाधव ,राहुल इंगळे , गजानन डोंगरदिवे , सागर जाधव , सिद्धोधन गवई,
विकी कांबळे ,अशोकराव वानखेडे , सुदर्शन निकाळजे , नितीन शेजूळ ,उद्धवराव वानखडे , राजू इंगळे , रतन वानखडे, सौरभ देशमुख, जकरंसिंग शिवणकर ,आकाश गोरे , गोविंदराव बोरसे, प्रमोद हिवराळे , अश्फाक खान ,रहमतुल्ला खान , अनिस खान शब्बीर खान, प्रमोद चौधरी , भारत सपकाळ
एडवोकेट.संदीपकुमार वानखेडे , सतीश दांडगे , पंजाबराव वानखडे ,सुमेध वानखडे, अमोल इंगळे , बीबीसार क्षीरसागर , अजय खरात,भीमसेन तायडे, सुजला साहू ,सुमित परदेशी, आकाश सोनवणे, भूषण जामनिक ,सुरज हिरोळे ,सचिन बागडे , विठ्ठल जाधव ,जीवन पाटील , सचिन पाखरे ,किशोर शिंदे
अनामिक वानखडे , उमेश जाधव ,अजीम दादा, गजू चौरे ,गजानन डोंगरदिवे ,विशाल शेळके,रफिक शहा लतीफ शहा या सर्वांनी याप्रसंगी बुलडाणा व अकोला जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी नरहरीदादा गवई यांचे नेतृत्वात मुंबई येथे अजितदादा पवार यांच्या हस्ते पक्ष प्रवेश केला.

