*अंगुराचा मळा मुख्य केंद्र*
नितीन फुलझाडे
चिखली : शहरातील अंगूरचा मळा परिसरात सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीररित्या गोवंश सदृश्य मास विक्री केल्याच्या आरोपावरून एका इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई दिनांक 23 मे 2025 रोजी सकाळी 6.50 ते 7.50 दरम्यान करण्यात आली. या प्रकरणी पोलीस हेडकॉन्स्टेबल कैलास चतरकर (रा. चिखली पोलीस स्टेशन) यांनी फिर्याद दाखल केली असून, आरोपीचे नाव शेख मुजाहिद शेख शब्बीर (वय 38, रा. अंगूरचा मळा, चिखली) असे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीच्या घरासमोर सार्वजनिक रस्त्यावर उभी असलेल्या ऑटो रिक्षातून गोवंश सदृश्यमास सुमारे 78 किलो (किंमत अंदाजे 11,700 रुपये) असा मुद्देमाल आढळून आला. तसेच मासाची कापणी करण्यासाठी वापरण्यात येणारे लोखंडी सुरा (200 रुपये), लाकडी ठोकळा (100 रुपये), इलेक्ट्रिक वजनकाटे (2,000 रुपये) व ऑटो रिक्षा (किंमत अंदाजे 45,000 रुपये) असा एकूण 59,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी आरोपीवर भारतीय दंड संहिता कलम 325 तसेच महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम 1976 मधील कलम 5, 5ब, 5क, 9, 9अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सपोनि स्वप्निल तायडे (पो.स्टे. चिखली) करीत आहेत.