चिखली- सालाबादप्रमाणे चिखली येथे दिनांक 29 मे 2025 रोजी शूरवीर वीर शिरोमणी हिंदू सूर्य महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण भव्य दिव्य अशी मोटरसायकल रॅली राहणार आहे तरी चिखली शहर व परिसरातील महाराणा प्रताप प्रेमी जनतेने या कार्यक्रमांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन हिंदूसूर्य महाराणा प्रताप जयंती उत्सव समिती चिखली 2025 च्या वतीने करण्यात आले आहे.
जगातील अत्यंत तेजस्वी "भूमिपुत्र" हिंदुसुर्य महाराणा प्रतापसिंह हे भारताच्या इतिहास पटलावर एक युगपुरुषाच्या रुपाने प्रकाशमान आहेत. या महापुरुषाने असाधारण साहस, असीम पराक्रम, जाज्वल्य देशाभिमान, अपूर्व त्याग, आत्मसन्मान अशा विविध गुणसमुहाच्या बळावर जनमाणसात अनन्य साधारण स्थान मिळविले आहे. जो पर्यंत विश्वात विरांची पुजा होत राहील, तो पर्यंत हिंदुसुर्य महाराणा प्रतापसिंह यांचे उज्वल व अमर नांव लोकांना स्वातंत्रता व स्वाभिमानाचा संदेश देतच राहील.
म्हणून हिंदुसुर्य महाराणा प्रतापसिंह तमाम भारतीयांसाठी एक प्रेरणास्त्रोत आहेत. त्यांची ४८५ वी जयंती गुरुवार दि. २९ मे २०२५ ला विविध कार्यकमांव्दारे साजरी होणार आहे.
चिखली शहरातील हृदय स्थानी बसवण्यात आलेल्या भव्य दिव्य अशा हिंदू सूर्य महाराणा प्रतापसिंह पुतळा परिसरात जयंती उत्सवाच्या सुरुवातीला म्हणजेच 28 मे 2025 च्या रात्री बारा वाजता फटाक्यांच्या तोफांची सलामी देत विद्युत रोषणाईसह फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येणार आहे
दिनांक 29 मे रोजी सकाळी राणाजींच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक ०९ ते ११ वा.रक्तगट तपासणी व रक्तदान शिबीर,स. ११ ते १
हिंदुसुर्य महाराणा प्रतापसिंह प्रतिमेची भव्य मिरवणुक व भव्य दिव्य अशी मोटारसायकल रॅली. १.३० वा.
हिंदुसुर्य महाराणा प्रतापसिंह प्रतिमेचे पुजन व सामूहिक अभिवादन व राष्ट्रगीताने सांगता. दुपारी २ वाजता महाप्रसाद
तरी जयंती उत्सवाच्या कार्यक्रमाला तमाम महाराणा प्रतापप्रेमींनी आपल्या मोटरसायकल वर भगवा ध्वज आणि डोक्यावरती भगवी टोपी परिधान करून मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन
हिंदुसुर्य महाराणा प्रतापसिंह जयंती उत्सव समिती चिखली जिल्हा बुलढाणा २०२५ च्या वतीने करण्यात आले आहे.
Tags
जयंती बातमी....