*फोटो मॉर्फिग करणाऱ्या विरोधात तक्रार दाखल*




*नितीन फुलझाडे*

*चिखली: जैन दिगंबर साधूंच्या फोटोची मॉर्फिग करून त्यांचा अपमान केल्याबाबत  चिखली पोलीस स्टेशनला ४ मे रोजी तक्रार दाखल करून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी विनंती निवेदन देऊन सकल जैन समाजातर्फे करण्यात आली आहे.*

   *निवेदनात म्हटले आहे की ज्ञानेश्वर भगाजी गाढे रा.जाफ्राबाद याने दिगंबर जैन साधूंच्या फोटोमध्ये मॉर्फिग करून त्यांचा अवमानकारक व आक्षेपार्ह स्वरूपाचा वापर केला आहे. या कृतीमुळे संपूर्ण जैन समाजाच्या भावना दुखावल्या आहेत व साधुसंतांच्या प्रतिमेचा अपमान झाला आहे. सदर मॉर्फिग केलेला फोटो आणि त्यासोबत ची अवमानकारक पोस्ट आरोपी ज्ञानेश्वर भगाजी गाढे याच्या वैयक्तिक फेसबुक प्रोफाईलवर टाकण्यात आली होती. ही कृती समाजामध्ये धार्मिक तेढ निर्माण करणारी असून कायद्यानुसार गुन्हा आहे. या प्रकरणाची पोलीस प्रशासनाने सखोल चौकशी करून संबंधित व्यक्तीवर पोलीस प्रशासनाद्वारे कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी असे निवेदनात म्हटले आहे.*

   *निवेदन देतांना श्रीकांत जैन अध्यक्ष १००८ महावीर दि जैन मंदिर, कीर्ती वायकोस,अमोल सुलाखे, संदीप वायकोस,अमित बेगानी, हेमंत शिसोदिया, रुपेश वायकोस, सतीश वायकोस, अमर गोसावी, अमोल पालकर, विनोद रुद्राक्ष, जयेश बेलोकर, मदन सराफ, वचन वायकोस, संजय सोनटक्के इत्यादी समाज बांधव उपस्थित होते.*

Previous Post Next Post