सकल जैन समाजातर्फे पोलीस निरीक्षक पाटील त्यांचा हृदय सत्कार

 



*नितीन फुलझाडे*

*चिखली:- महाराष्ट्र पोलीस दलातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल प्रदान करण्यात येणारे प्रतिष्ठित पोलीस महासंचालक पदक १ मे  रोजी चिखली पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष  पोलीस निरीक्षक संग्रामसिंह पाटील यांना प्रदान करण्यात आले. याबाबत सकल जैन समाजातर्फे त्यांचा हृदय सत्कार करण्यात आला.* 

       *महाराष्ट्र दिनानिमित्त बुलढाणा जिल्हा मुख्यालयात आयोजित भव्य सोहळ्यात पालकमंत्री ना. मकरंद पाटील, पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, आणि जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते हा सन्मान देण्यात आला होता याबाबत पोलीस निरीक्षक पाटील यांच्यावर विविध स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.* 

         *सकल जैन समाजाने देखील पोलीस निरीक्षक पाटील यांना कर्तव्य बजावताना प्रोत्साहन मिळावे यासाठी सत्कार केला व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी श्रीकांत जैन अध्यक्ष १००८ महावीर दि जैन मंदिर, कीर्ती वायकोस,अमोल सुलाखे, संदीप वायकोस,अमित बेगानी, हेमंत शिसोदिया, रुपेश वायकोस, सतीश वायकोस, अमर गोसावी, अमोल पालकर, विनोद रुद्राक्ष, जयेश बेलोकर, मदन सराफ, वचन वायकोस, संजय सोनटक्के इत्यादी समाज बांधव उपस्थित होते.*

Previous Post Next Post