शहरातील सर्व तक्रारीचा येत्या पंधरा दिवसात निपटारा करणार.... आ. सौ. श्वेताताई महाले पाटिल

 



नितीन फुलझाडे
चिखली न. प. मध्ये आ. सौ. श्वेताताई महाले यांच्या नेतृत्वात "लोकसंवाद" संपन्न...

 चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांनी चिखली शहरातील नागरिकांच्या समस्या व तक्रारी जाणून घेणे आणि शहरातील नागरिकांशी मोकळा संवाद साधता यावा या दृष्टीने आयोजित केलेल्या लोकसंवाद कार्यक्रमाला चिखली शहरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

 चिखली नगरपरिषदे अंतर्गत नगरपरिषद हद्दीमधील, चिखली शहरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या जाणून घेणे व त्यावर उपाययोजना सुचविणे यासाठी चिखलीच्या विद्यमान आमदार सौ श्वेताताई विद्याधर महाले पाटील यांच्या सूचनेनुसार चिखली नगर परिषदेमार्फत लोकसंवाद या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

 या लोकसंवाद कार्यक्रमाचे प्रास्तविक नगरपरिषदेचे श्री अर्जुन इंगळे यांनी सादर केले, कार्यालयीन आदेशाद्वारे नगर परिषदेच्या सर्व विभाग प्रमुखांना या कार्यक्रमाला आमंत्रित करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आमदार सौ श्वेताताई विद्याधर महाले या होत्या.

 लोकांच्या प्रचंड प्रतिसादात सुरू झालेल्या लोकसंवाद या कार्यक्रमांमध्ये चिखली येथील नजरेन चर्चला संरक्षण भिंत बांधून देणे. भीम ज्योती नगर येथील समाज मंदिराच्या अपूर्ण बांधकामाबद्दल तक्रारही ऐकून घेण्यात आली. महावीर नगर, टीचर्स कॉलनी मधील रस्त्यांच्या दुर्दशा बद्दल आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांच्यासमोर तक्रार मांडण्यात आली. संभाजीनगर चिखली मधील नागरिकांनी अरुंद रस्ते, नाली व ओपन स्पेस यांच्या योग्य उपयोगा बाबत आमदार महाले यांना निवेदन दिले. माळीपुरा येथील पंचशील ध्वज काढल्या बाबत व तेथे अतिक्रमण केले याची तक्रार दाखल करूनही नगरपरिषद अतिक्रमण काढत नाही याबद्दल नगर परिषदेची तक्रार आमदार सौ.महाले यांच्याकडे माळीपुरातील महिलेने केली. समर्थ नगर चिखली येथील नाली बांधकामाबद्दल आमदार यांच्याकडे तक्रार सुपूर्द करण्यात आली. अर्धवट राहिलेल्या व दुरुस्त करण्यायोग्य असलेल्या रस्त्यांचे बांधकाम पूर्ण करून देण्यात यावे अशी तक्रार व निवेदने आमदार सौ श्वेताताई महाले यांना देण्यात आले.

 आमदार सौ श्वेता ताई महाले पाटील यांनी सर्व संबंधितांकडून व आलेल्या जनतेशी संवाद साधून, त्यांच्याकडून लेखी तक्रारी व निवेदने घेतली आणि सर्व तक्रारी व निवेदने यावर पुढील पंधरा दिवसात कार्यवाही करण्यात येईल यासंबंधी सगळ्यांना आश्वस्त केले. सदर लोकसंवाद कार्यक्रमांमध्ये वारसा पद्धतीने दोन वारसांना आमदार श्वेता ताई महाले पाटील यांच्या हस्ते नियुक्त पत्रे ही देण्यात आली.

 तत्पूर्वी नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री प्रशांत बिडगर यांनी आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांना लोकसंवाद कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विराजमान व्हावे अशी विनंती केली त्याचप्रमाणे जिवंत सातबारा मोहिमेमुळे चिखली तालुक्यामध्ये अनेक आश्वासक बदल घडवणारे तहसीलदार श्री संतोष काकडे व चिखली शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री संग्राम पाटील यांना पोलीस महासंचालक यांच्याकडून मानाचे पदक मिळाल्याबद्दल त्यांचे स्वागतही या लोकसंवाद कार्यक्रमात करण्यात आले.

 आमदार सौ श्वेता ताई महाले पाटील यांच्या सूचनेनुसार सुरू करण्यात आलेल्या लोकसंवाद या प्रत्यक्ष जनतेमध्ये जाऊन, जनतेशी संवाद साधून, जनतेकडूनच त्यांना भेडसावणाऱ्या तक्रारी ऐकून घेण्याचा व या तक्रारीवर तात्काळ उपाय देण्याचा कार्यक्रमाचे पुढचे पाऊल म्हणून उद्या दिनांक सहा मे रोजी पंचायत समिती कार्यालय, चिखली येथे आमदार सौ श्वेता ताई महाले पाटील या चिखली ग्रामीण मधील पंचायत समितीशी संबंधित लोकांच्या तक्रारी ऐकून घेऊन त्यांना योग्य ते मार्गदर्शन व उपाय योजना देणार आहेत. श्री नगरपरिषद चिखली येथे संपन्न झालेल्या लोकसंवाद कार्यक्रमाला जसा उत्स्फूर्त प्रतिसाद सर्व नागरिकांनी दिला तसाच उत्स्फूर्त प्रतिसाद चिखली मतदारसंघातील ग्रामीण जनतेने पंचायत समिती कार्यालय चिखली येथे जमून, व आपल्या तक्रारी सोडवून घेऊन द्यावा.! असे आवाहन आमदार श्वेता ताई महाले पाटील यांच्या कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.
        आज नगरपरिषद चिखली येथे पार पडलेल्या या लोकसंवाद कार्यक्रमाला खालील प्रमाणे उपस्थिती लाभली होती.संतोष काकडे (तहसीलदार, चिखली)संग्राम पाटील (ठाणेदार, चिखली ),प्रशांत बिडकर (मुख्याधीकारी, न. प. चिखली ),विजय कोठारी ( प्रदेश कार्यकारणी सदस्य )सुरेशआप्पा खबुतरे ( भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य )
ह.भ.प.प्रकाश महाराज जवंजाळ ( प्रदेश कार्यकारणी सदस्य )डॉ.प्रतापसिंग राजपुत ( भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य ),
शंतनु बोन्द्रे ( जिल्हा कार्याध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस ),पंडितदादा देशमुख, सागर पुरोहित ( शहराध्यक्ष, भाजप ),रामदासभाऊ देव्हडे,अनिस भाई,संजय गाडेकर,विलास घोलप,शेखर बोन्द्रे,युवराज भुसारी,सचिन कोकाटे,महेश लोणकर,दिपक लहाने,सुभाषआप्पा झगडे,चेतन देशमुख ,शैलेश देशमुख,श्याम वाकदकर,राजेंद्र घोगे,विजय नकवाल,शेख करामत,गोविंद देव्हडे,सुरेंद्रजी पांडे,सुदर्शन खरात इ. उपस्थित होते.
Previous Post Next Post