सर्वोदय व महाराष्ट्र नशाबंदी मंडळाचे जनजागृती अभियान



31 मे जागतिक तंबाखूविरोधी दिन...

नितीन फुलझाडे 

अकोला -- तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करण्यापासून लोकांना परावृत्त करण्यासाठी महाराष्ट्र नशाबंदी मंडळ व जिल्हा सर्वोदय मंडळाचे संयुक्त विद्यमाने जिल्ह्यात 31 मे 2025 पासून तंबाखू विरोधी जनजागृती अभियान राबविण्यात येत असल्याची माहिती महाराष्ट्र नशाबंदी मंडळाचे जिल्हा संघटक व अकोला जिल्हा सर्वोदय मंडळाचे अध्यक्ष बबनराव कानकिरड यांनी दिली.

             तंबाखूचे सेवन आरोग्यासाठी घातक ठरू शकते. तंबाखू किंवा धूम्रपानामुळे व्यक्तीच्या मानसिक आरोग्यावर तसेच शारीरिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो तथापि हे माहीत असूनही  मोठ्या संख्येने लोक फसव्या जाहिरातीला बळी पडुन कोणत्या ना कोणत्या स्वरूपात तंबाखूचे सेवन करतात. लोकांमध्ये गुटखा, बिडी, सिगारेट इत्यादीच्या सेवनाने अनेक आजारांचा धोका सतत वाढत आहे. तज्ज्ञांच्या मते तंबाखूच्या सेवनाने अनेक गंभीर आणि जीव घेण्या आजारांचे धोके वाढत आहेत. फुफुसाचा  कर्करोग, यकृताचा कर्करोग, तोंडाचा कर्करोग  आतड्याचा  कर्करोग आणि गर्भाशयाचा कर्करोग यांचा धोका असतो याशिवाय ह्दयविकार आणि इरेक्टाइल  डिस्फंक्शन सारखे गंभीर आजार होऊ शकतात.  किशोरवयीन मुलांमध्ये असे घातक व्यसन लागू नये यासाठी या अभियानातून शाळा महाविद्यालयांमधून जनजागृती करणे, व्यसनविरोधी कार्यशाळा घेणे, व्यसन मुक्ती चित्र प्रदर्शनी आयोजित करणे.जागतिक तंबाखू विरोधी दिन केवळ एका दिवसापुरता साजरा न करता तंबाखूच्या वापराच्या विनाशकारी परिणामांशी संघर्षासाठी एक व्यसनमुक्त विचारांची तरुण पिढी संघटित करणे हा या मागचा  उद्देश आहे.



     ●2025 जागतिक तंबाखू दिनाची थीम आहे...'उज्वल उत्पादने.काळे हेतू.अपील उघड करणे.' ●


या वर्षीची थीम  ही  तंबाखू उद्योगाकडून त्यांची उत्पादने आकर्षक बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या हेराफेरीच्या युक्त्यांचा पर्दाफाश करते. विशेषतः तरुणांना आणि असुरक्षित लोकसंख्येला रंगीबेरंगी पॅकेजिंग आणि आकर्षक जाहिराती ते चवदार प्रकार आणि डिजिटल मार्केटिंग पर्यंत तंबाखू उत्पादने जाणून-बुजून चमकदार आणि आकर्षक दिसण्यासाठी तयार केली जातात. त्यांच्या मागील घातक परिणाम लपवतात. या उज्वल उत्पादनाच्या नावाने करण्यात येणारे काळे हेतू त्यांचे अपील  विषयी लोकांमध्ये त्यांच्याविरुद्ध जनजागृती करणे. तंबाखू वापराच्या परिणामाबद्दल जागरूकता निर्माण करून लोकांना धूम्रपान सोडण्यास प्रोत्साहित करण्यासाठी 31 मे पासून महाराष्ट्र नशाबंदी मंडळ व सर्वोदय यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र शासन, आरोग्य विभागाच्या प्रेरणेने जिल्ह्यात तंबाखू विरोधी जनजागरण अभियान  गावागावात राबविणार आहेत.

        ज्येष्ठ सर्वोदयी महादेवराव  भुईभार,डॉ.शि.ना. ठाकूर, प्रल्हादराव नेमाडे, डॉ. मिलिंद निवाने,जयकृष्ण वाकोडे, ह. बा. खंडारे गुरुजी, प्रा. सुधाकर गौरखेडे, महेश आडे, लोककवी तेजराव भिसे, शीघ्रकवी रामराव पाटेखेडे आदी कार्यकर्ते या अभियानात व्यसनमुक्ती वर प्रबोधन करून युवकांना तंबाखू मुक्तीची प्रतिज्ञा देतील. 

     नवीन पिढीला व्यसनाच्या आहारी जाण्यापासून रोखण्यासाठी, या तंबाखू उद्योगांच्या प्रभावापासून मजबूत संरक्षण देण्याची गरज आहे. म्हणून या अभियानात तंबाखू व  तंबाखूजन्य व्यसनाविरोधात प्रबोधन करण्यात येत आहे.

Previous Post Next Post