मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना धारक "सौरगाव चांडोळ "
वीज निर्मिती करताना विजेची मागणी व विजेचा पुरवठा यात संतुलन घालता यावा म्हणून शेतकऱ्यांना अर्धवेळ रात्रीच्या वेळी वीज उपलब्ध करून दिली जात असे परंतु रात्रीच्या वेळी शेतीला पाणी देताना अनेक वेळा शेतकऱ्यांना अनेक संकटाला तोंड द्यावे लागत असे, कधी बिबट्याचा हल्ला कधी कोल्ह्यांचा हल्ला, कधी सर्पदंश झाल्याने होणारे मृत्यू यामुळे मायबाप शेतकऱ्यांच्या जीवनात येणाऱ्या असंख्य अडचणींना जाणून दूरदर्शी तत्कालीन मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी 2017 मध्ये सौर कृषी वाहिनी योजना सुरू केली होती. पुन्हा मुख्यमंत्री झाल्यानंतर माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी सौर कृषी वाहिनी योजना 2.0 योजनेला आपल्या प्रशासनाची एक महत्वपूर्ण योजना जाहीर करून महाराष्ट्रात स्थापन झालेले महायुतीचे सरकार हे प्रामुख्याने शेतकरी व कष्टकरी लोकांची काळजी करणारे शेतकरी केंद्रित सरकार असणार असल्याचे अप्रत्यक्षपणे जाहीरच करून टाकले.
रात्रीच्या वीज पुरवठ्यामुळे शेतकर्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असून दिवसा शेतकर्यांना विश्वासार्ह वीज पुरवठा मिळावा अशी मागणी अनेक दिवसांपासून होत असून आपल्या मतदारसंघातील लोकांची ही मागणी पूर्ण करू शकत असल्याचे समाधान आपल्याला आहे.असे भावनिक उद्गार आमदार सौ श्वेता ताई महाले यांनी चांडोळ येथे सोलर पार्कचे लोकार्पण करताना काढले.
ग्रामीण भागातील जनतेला विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 राबवली जात असून चिखलीच्या आमदार विकास कन्या सौ श्वेताताई विद्याधर महाले यांच्या विशेष प्रयत्नांतून चांडोळ (ता. बुलडाणा) येथे मंजूर सोलर पार्कचे लोकार्पण त्यांच्या हस्ते संपन्न झाले.
या पार्कची विद्युत निर्मिती क्षमता 5 मेगावॅट असेल आणि यासाठी 20 कोटी रुपयांची गुंतवणूक शासनाने केली असून या परिसरातील 1648 शेतकऱ्यांना या सौर प्रकल्पाचा लाभ होणार आहे. महाराष्ट्र शासनाचा ऊर्जा विभाग व महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि. च्या वतीने हा सोहळा आयोजित करण्यात होता.
या सौर पार्क मधून निर्माण होणाऱ्या ऊर्जेचे पर्यावरणासाठी अनेक फायदे असून त्यामधून स्वच्छ ऊर्जा प्राप्त होईल,
सौर पार्क जीवाश्म इंधनांचा वापर कमी करतो त्यामुळे हानिकारक वायूंचे उत्सर्जन होत नाही, ज्यामुळे हवा शुद्ध राहते. सोलर पार्क मधून निर्माण होणारी ऊर्जा ही पर्यावरण पूरक असते.सौर ऊर्जा नैसर्गिकरित्या उपलब्ध आहे, त्यामुळे तिची निर्मिती करताना पर्यावरणावर नकारात्मक परिणाम होत नाही.
एकदा सौर पार्क स्थापित झाल्यावर, वीज निर्मितीचा खर्च कमी होतो, कारण सौर ऊर्जा मोफत उपलब्ध आहे.सौर पार्क ऊर्जा निर्मितीमध्ये देशावर अवलंबून न राहता, स्वतःची ऊर्जा निर्मिती करू शकतो, ज्यामुळे ऊर्जा सुरक्षा वाढते.त्याचप्रमाणे सोलार पार्कचे अन्य सामाजिक फायदे ही आहेत.सौर पार्कच्या उभारणीत आणि देखभालीत अनेक लोकांची रोजगाराची संधी निर्माण होते.सौर ऊर्जा ग्रामीण भागांमध्ये वीज पुरवण्यासाठी मदत करते, ज्यामुळे तेथील लोकांचे जीवनमान सुधारते.असे सौ श्वेता ताई विद्याधर महाले यांनी संबंधितांना संबोधित करताना सांगितले.
या सोहळ्यास सर्वश्री देविदास पाटील जाधव जिल्हा सरचिटणीस भाजपा, ओमसिंग राजपूत जिल्हाप्रमुख शिवसेना, डॉ. तेजराव नरवाडे जिल्हा उपाध्यक्ष भाजप, श्रीरंगअण्णा वेंडोले ज्येष्ठ नेते भाजप, चव्हाण साहेब महावितरण कार्यकारी अभियंता, पोरे साहेब अतिरिक्त कार्यकारी अभियंता, ॲड. मोहन पवार तालुका अध्यक्ष भाजप, नीलेश देठे तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी कँग्रेस, सतीश पाटील भाकरे तालुका अध्यक्ष युवा मोर्चा, प्रताप शेठ मेहर ,योगेश राजपूत, विष्णू पाटील वाघ, दिगंबर जाधव, विशाल विसपुते, राजू चांदा, सुरेश धनावत, गजानन देशमुख, पुरुषोत्तम भोंडे, अनिल जाधव, अनिल अपार, सखाराम नेमाडे, विष्णू उगले आदी उपस्थित होते.
Tags
चिखली


