समाजाला धर्म आणि संस्काराचे धडे द्यायचे असतील तर आध्यात्मिक कार्यक्रमांची नितांत गरज - आचार्य श्री हरिचैतन्यजी स्वामी महाराज



चिखली/ प्रति :  समाजाला धर्म आणि अध्यात्मिकतेचे धडे द्यायचे असेल तर आध्यात्मिक कार्यक्रमांची नितांत आवश्यकता असल्याचे मत परमपूज्य वेदांताचार्य आचार्य 1008 श्री हरिचैतन्यजी स्वामी महाराज यांनी केले. विदर्भ मराठवाडा सरहद्दीवर युवा सेना जिल्हाप्रमुख नंदकिशोर कर्‍हाडे यांनी आयोजित केलेल्या शिवगणेश मूर्ती प्राणप्रतिष्ठापना 9 व्या वर्धापन दिनानिमित्त ते बोलत होते.
  यावेळी प्रमुख उपस्थिती मध्ये माजी आमदार रेखाताई खेडेकर,शिवसेना संपर्कप्रमुख प्रा.नरेंद्र खेडेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवंत शिवसेना महाराष्ट्र प्रवक्त्या जयश्रीताई शेळके, हिरकणी महीला अर्बन बँकेच्या अधक्ष्या वृषालीताई बोंद्रे चिखली अर्बन बँकेचे अध्यक्ष सतीश गुप्त अंबिका अर्बन बँकेचे अध्यक्ष विजुभाऊ कोठारी, शिक्षक प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रामकृष्णदादा शेटे, भाजपा ज्येष्ठ नेते डॉ प्रतापसिंग राजपूत साहेब श्रीराम नागरी बैंकेचे अध्यक्ष भाजपा शहरप्रमुख पंडितदादा देशमुख, अंबिका अर्बन बँकेचे संचालक हनुमंत भवर, शिवसेना नेते कपिल खेडेकर, मुंगसाजी बैंकेचे अध्यक्ष दिपक देशमाने, चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संतोष वानखेडे, राजश्री शाहू परिवाराचे अध्यक्ष संदीपदादा शेळके, शिवसेना उपजिल्हाप्रमुख आशिष रहाटे, चिखली पोलीस स्टेशनचे ठाणेदार संग्राम पाटील,  तालुकाप्रमुख  किसनराव धोंडगे, संजय गाडेकर जालना उपजिल्हाप्रमुख रमेश पाटील गव्हाड, शहर प्रमुख श्रीराम झोरे, महिला आघाडीच्या जिजाताई राठोड, पं. स.च्या सभापती संगीताताई पांढरे, पं. स.च्या सदस्या उषाताई थूट्टे, भाजपा नेते वीरेंद्र वानखेडे, उपजिल्हाप्रमुख अशोक राजपूत, सहदेव सुरडकर, दत्ता सुसर, अरुण अंबस्कर, दीपक पाटील, प्रदीप हाके. विधानसभा संघटक हरी इंगळे, युवासेना शहरप्रमुख आनंद गैची, विलास सुरडकर, शंभू गाडेकर, अनिल जावरे, समाधान जाधव, भोकर गावचे सरपंच सौ लताताई फोलाने, उपसरपंच ग्रा.पं. सदस्य तंटामुक्ती अध्यक्ष यांच्यासह अनेक  मान्यवर उपस्थित होते..
 मानवी समाजाला आज संस्कारांची नितांत आवश्यकता आहे आणि आध्यात्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून संत समाजाला धर्म आणि संस्काराची मूल्ये देत असतात त्यामुळे अध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन होणे नितांत गरजेचे आहे. धर्म आणि संस्कृती रक्षणासाठी भव्य मंदिरांची उभारणी झाली पाहिजे आणि त्या ठिकाणाहून आध्यात्मिक मूल्य समाजामध्ये रुजवली गेली पाहिजेत यासाठी गेल्या नऊ वर्षापासून निस्वार्थपणे नंदूभाऊ कर्‍हाडे या उजाड माळरांनावर जे प्रयत्न करत आहे ते निश्चितच कौतुकास्पद आहे असेही स्वामी महाराज म्हणाले. या कार्यक्रमाला दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महिलांची लक्षणीय  उपस्थिती होती आणि हाच धागा पकडून संस्कृती रक्षणासाठी महिलांचा खूप मोठा सहभाग असून  कुटुंब आणि समाज सुसंस्कृत बनविण्याची खूप मोठी शक्ती महिलांमध्ये आहे आणि ते त्यांनी करावं अस आवाहनही स्वामी महाराजांनी केलं. या सोबतच या ठिकाणी धर्म रक्षणासाठी खूप मोठे भव्य मंदिर उभारण्याचा संकल्प स्वामी महाराजांनी उपस्थित भाविकांना दिला.. विदर्भ मराठवाड्याच्या सरहद्दीवरील वरील हे मंदिर फक्त दोन प्रांतांनाच जोडणारे नसून या दोन प्रांतातील विविध जाती धर्माच्या लोकांची मने जोडणारा एक दुवा ठरेल यात शंका नसल्याचे स्वामी महाराजांनी प्रतिपादन केले.. धर्म आणि अध्यात्म बरोबरच या उजाड माळरानावर झाडांची लागवड ही चैतन्य देणारी असून प्रत्येकाने झाडे लावून पर्यावरणाचे रक्षण केले पाहिजेत असाही संदेश परमपूज्य स्वामी महाराजांनी दिला.. अल्पावधीतच भाविकांच्या नवसाला पावणारे दैवत म्हणून हे ठिकाण नावारूपाला आलेले असून दर चतुर्थीला असंख्य भाविक  अत्यंत श्रद्धेने या ठिकाणी नवस फेडण्यासाठी गर्दी करतात.. भविष्यात निश्चितच हे खूप मोठे आध्यात्मिक केंद्र ठरेल असा आशीर्वादही परमपूज्य स्वामीजींनी यावेळी दिला.
  शिव गणेश गणपती बाप्पा... परमपूज्य स्वामीजी महाराज आणि मायबाप जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने या उजाड माळरानावर चैतन्य उभ करू शकलो या जीवनाची सार्थकता वाटत असून आयुष्यभर माझ्याकडून अशीच सेवा घडत राहावी व सर्व मित्र मंडळी पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांचे असे सहकार्य लाभो असे भावनिक आभार कार्यक्रमाचे आयोजक नंदू कर्‍हाडे यांनी व्यक्त केले.
  या कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतून संपूर्ण भगव्या वस्रामध्ये महिला मंडळाच्या 58, भजनी दिंड्यांचे आगमन झाले होते.. भगवा वस्त्रातील मातृशक्तीच्या रूपात येथे भगवा जनसागर उसळला असल्याचे जाणवत होते, यावेळी चिखली तालुक्यातील सर्वच धर्माचे सर्व पक्षांचे प्रमुख नेते प्रमुख पदाधिकारी केळवद जिल्हा परीषद सर्कल मधील सरपंच उपसरपंच आजी माजी लोकप्रिनिधीं शिवसेना युवासेना प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते, सर्वच शिवगनेश परिवाराचे स्वयंसेवक गावकरी मंडळी व श्री शिवगनेश व गुरूदेव भक्त  यांच्यासह उपस्थित मान्यवरांचे समायोचित भाषणे झाली.. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन.. शाम गायकवाड यांनी. यांनी केले.. भव्य महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली,
Previous Post Next Post