शहराध्यक्ष पदी निवडीबद्दल सागर पुरोहित यांचा बालाजी अर्बन परिवारातर्फे सत्कार


चिखली:- नुकत्याच चिखली व तालुक्यातील नवीन भाजपा अध्यक्षाची नियुक्ती करण्यात आली यामध्ये चिखली शहरअध्यक्ष पदी सागर पुरोहित यांची निवड करण्यात आली.
त्यानिमित्त दिनांक 21 एप्रिल रोज सोमवारला बालाजी अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी चिखली संस्थेच्या वतीने नवनिर्वाचित भाजप शहराध्यक्ष  सागर पुरोहित यांचा संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष मा. ॲड.मंगेश व्यवहारे यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन  सत्कार केला. याप्रसंगी उपाध्यक्ष सत्यनारायण लढ्ढा, संस्थेचे सरव्यवस्थापक अनिल गाडे व इतर सर्व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी अध्यक्ष ॲड. मंगेश व्यवहारे यांनी पुरोहित यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी सागर पुरोहित यांनी ‘देशप्रथम’ या सूत्राने काम करणाऱ्या संघटनेमध्ये काम करत असल्याबद्दल अभिमान असून व भविष्यात आदणीय पंतप्रधान श्री मोदीजी व श्री अमितजी शाह तसेच राष्ट्रीय व प्रदेश अध्यक्षांच्या मार्गदर्शनात अजून चांगले काम करण्यासाठी प्रयत्नरत राहील असे सांगितले.

Previous Post Next Post