बुलढाणा अर्बन कंझ्युमर स्टोअर्स तर्फे रत्नागिरी हापूस आंबा विक्रीस उपलब्ध..
बुलडाणा अर्बन चे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री. राधेश्याम चांडक उपाख्य भाईजी तसेच बुलडाणा अर्बन संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुकेशजी झंवर आणि बुलडाणा अर्बन चॅरिटेबल संस्थेच्या अध्यक्षा सौ.कोमल सुकेशजी झंवर यांच्या मार्गदर्शनातून बुलढाणा अर्बन कंझुमर स्टोअर्स द्वारा नेहमीच नवनवीन उपक्रम राबविण्यात येतात.यामध्ये रत्नागिरी चा राजा "हापूस आंबा"कास्तकाराच्या बागेमधून सभासद ग्राहक व जिल्हावांसीसाठी सदैव विक्रीसाठी उपलब्ध केले जाते.संस्थेच्या सर्व सभासद ग्राहकांनी व बुलढाणा वासियांनी योग्य दरात उच्चप्रतीचा हापूस आंबा खरेदी करावा असे आवाहन बुलडाणा अर्बनचे अध्यक्ष डॉ. सुकेशजी झंवर साहेब यांनी केले.यावर्षी सुद्धा बुलडाणा अर्बन कंझ्युमर स्टोअर्स तर्फे रत्नागिरी हापूस आंबा युनियन बँक च्या बाजूला,रेणुका मंगल कार्यालय मागे, जेल रोड, बुलढाणा येथे विक्रीस उपलब्ध करण्यात आले आहे. या हापूस आंबा विक्री केंद्राचे उद्घाटन दिनांक 24 एप्रिल 2025 रोजी बुलढाणा अर्बन संस्थेचे सरव्यवस्थापक श्री.कैलासजी कासट यांच्या शुभहस्ते करण्यात आले आहे.यावेळी प्रथम ग्राहक म्हणून श्री. नंदकिशोर बाहेकर, श्री प्रभाकरराव बाहेकर, सौ भावना पाचरणे पुणे, श्री महाजन सर सरस्वती श्री.नितीन काळे डॉ. अँड . माहेश्वरी साहेब श्री. मनोहर केंद्रे, श्री पाटील साहेब रानात गेस्ट हाऊस, श्री. सोनारे श्री.संजय ठेंग,श्री.दीपक कुटे,श्री.सूरज मछले, श्री.किशोर सरकटे श्री श्याम टेकले, श्री संतोष डुकरे आणि बुलडाणा अर्बन स्टोअर्स चे व्यवस्थापक श्री.संजय कस्तुरे, कर्मचारी सतीश उबाळे, विकास उबाळे, सुशील वानखडे हे उपस्थित होते.
Tags
आपला बुलड़ाना
