आमदार महाले यांनी केली विकासकामांची पाहणी.. विकास कामे जलद गतीने व उत्कृष्ट दर्जाची व्हावीत याबाबत केल्या अधिकाऱ्यांना सूचना...

विकासपर्व 2.0

आमदार श्वेताताई महाले यांनी केली विकास कामांची पाहणी....

चिखली नगरपरिषद हद्दीमध्ये, चिखली नगरपरिषद व सार्वजनिक बांधकाम विभाग बुलढाणा जिल्हा यांच्यामार्फत सुरू असलेल्या विविध विकासकामांचा आढावा आ. श्वेताताई महाले यांच्याकडून घेण्यात आला.

राज्यातील नगरपरिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान देण्यात येते. सदर योजनेचे सुधारीत निकष व मार्गदर्शक तत्वे शासन निर्णयान्वये विहित करण्यात आलेले आहेत. सदर शासन निर्णयांच्या अनुषंगाने, "वैशिष्ट्यपूर्ण" या योजनेअंतर्गत राज्यातील नगर परिषद / नगर पंचायतींना निधी व कामे मंजूर करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

"नगरपरिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान" या योजनेंतर्गत चिखली नगरपरिषद जि. बुलडाणा रक्कम रु.५,००,००,०००/- (अक्षरी रक्कम रुपये पाच कोटी निधी) इतका निधी "चिखली नगरपरिषद क्षेत्रात *स्वर्गीय दयासागरजी महाले सांस्कृतिक सभागृह* बांधकाम करणे." या कामाकरिता वितरीत करण्यात आला आहे.विविध विषयांवरील कार्यशाळा, चर्चा, भाषण, चर्चासत्रे, तसेच सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक, आणि धार्मिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमांसाठी या सभागृहाचा वापर केला जाऊ शकतो.

आसनक्षमता व सोयी सुविधेच्या दृष्टीने हे संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात मोठे सभागृह होण्याची शक्यता आहे.चिखली सारख्या छोट्या नगर परिषदेला हा बहुमान मिळण्यामागे आमदार श्वेताताई महाले आणी मा. मुख्यमंत्री यांचे स्वीय सहाय्यक असलेले श्री विद्याधरजी महाले यांचे विशेष परिश्रम व योगदान आहे.या सांस्कृतिक भवनाच्या बांधकामांमध्ये कुठल्याही प्रकारची त्रुटी राहू नये, चिखली शहरातील सर्व विकासकामांना गती द्यावी म्हणून
अनेक कोटींच्या शहराच्या विकासकामांचा आ. महाले यांनी आढावा घेतला.

मागील आर्थिक वर्षात मंजूर झालेली कामे, त्यातील सुरू असलेली कामे व पूर्ण झालेली कामे, त्या कामांचा दर्जा, प्रस्तावित व संपन्न विकास कामांमधून जनतेला मिळणाऱ्या सोयीसुविधा, त्यातून निर्माण होणाऱ्या विविध संधी यांचाही आढावा आ. महाले यांनी त्यांच्या खास शैलीत घेतला. विकासासाठी खर्च करण्यात येणाऱ्या प्रत्येक पैशामागे जनतेला कोणत्या सोयी उपलब्ध होतील?सामान्य जनतेच्या जीवनामध्ये त्यातून काय सकारात्मक परिणाम साधले जातील?चिखली शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सामान्यातील सामान्य माणसाचा ही सहभाग कसाा वाढवता येईल?आणि चिखली शहरातील अगदी खालच्या आर्थिक स्तरात असलेल्या मनुष्यालाही नगरपरिषद आणी अधिकारी, कर्मचारी यांच्याकडून सुविधा कशा पुरवता येतील. यासंबंधी एक आदर्श वस्तू पाठच आमदार सौ श्वेताताई विद्याधर महाले यांनी घालून दिला.

चिखली शहरासाठी तयार करण्यात येत असलेल्या स्व. दयासागरजी महाले सांस्कृतिक भवनाच्या बांधकामाबाबत अधिक चांगले बांधकाम करण्यासंबंधी त्याचप्रमाणे या सांस्कृतिक भावनांमध्ये अतिशय उच्च दर्जाचे फर्निचर व साऊंड सिस्टिम लागतील याची काळजी घ्यावी यासंबंधी नगरपरिषद मुख्याधिकारी यांनी वैयक्तिक लक्ष द्यावे असे सौ. श्वेताताई महाले यांनी सुचित केले.

यासोबतच सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्हा बुलढाणा यांच्याकडून चिखली येथे नवीन विश्रामगृहाचे बांधकाम अतिशय वेगाने सुरु असून जवळजवळ पाच कोटी रु. अंदाजपत्रकीय किंमत असलेल्या विश्रामगृहाचे तळमजल्याचे काम पूर्ण झाले असून पहिल्या मजल्याचे कामही अतिशय वेगाने सुरु आहे.या विश्रामगृहाच्या पूर्णतेमुळे राज्य व राष्ट्रीय स्तरावरील प्रभावी व्यक्तींचा चिखली शहरातील मुक्काम वाढणार असून त्या अनुषंगाने चिखली शहराच्या विकासाला आणखी गती मिळणार आहे.

त्याचप्रमाणे चिखली येथे मुख्य प्रशासकीय भवनाचे बांधकाम करण्यासाठी जवळजवळ सोळा कोटी सोळा लाख एवढा प्रचंड निधी राज्यसरकारकडून उपलब्ध करून देण्यात आला असून या प्रशासकीय भवनाचाही तळमजला पूर्णपणे तयार असून पहिल्या मजल्याचे बांधकाम सुरू आहे.चिखली येथील या मुख्य प्रशासकीय भवनामध्ये जवळजवळ महत्त्वाची सर्व सरकारी कार्यालय असणार असून तळमजला व पहिल्या मजल्यामध्ये खालीलप्रमाणे कार्यालये व सुविधा असणार आहेत.


:- तळ मजला

1) मुख्य प्रवेश लॉबी
2) महसुल सेतु कार्यालय
3) उपविभागीय अधिकारी (तहसिलदार कार्यालय)
4) तालुका निरीक्षक कार्यालय, भुमी अभिलेख
5) स्टॅम्प कार्यालय
6) लोक अदालत
7) स्टोअर
8) महसुल कार्यालय
9) उपकोषागार कार्यालय
10) उपहार गृह
11) पेंट्री
12) किचन
13) स्टोअर

पहिला मजला

1) कॉन्फेरेंस खोली
2) VIP कक्ष
3) वन विभागीय कार्यालय
4) तालुका कृषी कार्यालय
5) प्रतिक्षा हॉल
6) कॉमन कक्ष
7) सभागृह
8) संगणक कक्ष
9) स्टोअर
10) व्हिडीओ कॉन्फरन्स कक्ष
11) तहसिल कार्यालय
12) तालुका नोंदणी कार्यालय
13) उप नोंदणी कार्यालय

या सर्व बांधकामाची सद्यस्थिती व त्यांची प्रगती तसेच आवश्यक सूचना सर्व अधिकारी वर्गाला आ. सौ. श्वेताताई महाले यांच्याकडून देण्यात आल्या.याप्रसंगी आ. सौ. महाले यांच्यासोबत पंडीतदादा देशमुख- शहराध्यक्ष भाजपा,सुरेंद्रप्रसाद पांडे -जिल्हा कार्यकारणी सदस्य भाजपा,
सुहास शेटे - जिल्हा कोषाध्यक्ष भाजपा,
युवराज भुसारी - शहर सरचिटणीस भाजपा, महेश लोणकर ,शे. अनिस शे-बुढण- अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष भाजपा, गोविंद देव्हडे माजी नगरसेवक,
शैलेश बाहेती,सागर पुरोहीत -युवा मोर्चा शहराध्यक्ष,श्री संजय गाडेकर, श्री पवन लद्धा,श्री समाधान गाडेकर पत्रकार, विजय तिवारी - शहर सरचिटणीस,सलीम परवेज,
ऍड. संजीव सदार,हरीभाऊ परिहार,गोविंद काका गिनोडे,विजय वाळेकर - युवा मोर्चा पदाधिकारी,संदीप लोखंडे,दत्ता सुसर - माजी नगरसेवक,विलास घोलप-शिवसेना शहर प्रमुख इ. सर्व उपस्थित होते.

Previous Post Next Post