चिखली:- चिखली ते जाफराबाद रोड दरम्यान भोकर शिवारात दिनांक 7 मार्च रोजी सायंकाळी चार वाजे दरम्यान एका चाळीस वर्षीय इसमाचा बेवारस मृतदेह आढळून आला असून भोकर येथील पोलीस पाटील प्रल्हाद इंगळे यांनी याबाबत पोलीस स्टेशन चिखली येथे फिर्याद दाखल केली आहे.
याबाबत सविस्तर असे की फिर्यादी पोलीस पाटील प्रल्हाद इंगळे यांनी पोलीस स्टेशन चिखली येथे फोन द्वारे माहिती दिली की भोकर शिवारात एक अनोळखी पुरुष जातीचे प्रेत मृत अवस्थेत पडून आहे त्यानुसार चिखली पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांनी त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता एक पुरुष जातीचे प्रेत वय अंदाजे 40 वर्ष,अंगात कथीया काळपट चौकटी असलेले फुल बाह्याचे शर्ट, पायात काळपट रंगाची नाईट पॅन्ट व फिकट हिरव्या रंगाची निकर, उजव्या हातात पंचरंगी व लाल रंगाचा धागा तसेच उजव्या हातावर महेंद्र व ओम असे गोंदलेले आहे. उजव्या कानात पिवळ्या धातूची बाळी आहे. सदर इसमाचा आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला असता ओळख पटली नसल्याने वरील वर्णनाचा इसम आपल्या पोलीस हद्दीत हरविला असल्यास किंवा त्याची काही माहिती मिळाल्यास मोबाईल 98 50 58 81 50 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन चिखली पोलिसांनी केले आहे.तसेच अनोळखी मृतदेहाची ओळख पटविण्याचे आवाहन केले आहे.मृतदेह ग्रामीण रुग्णालय चिखली येथे ठेवण्यात आलेला आहे. याबाबत मार्ग क्रमांक 15/2025 कलम 194 बी एन एस एस प्रमाणे मार्ग दाखल झाला आहे. पुढील तपास चिखली पोलीस स्टेशनचे ठाणेदार संग्राम पाटील यांचे मार्गदर्शनात पोलीस हेडकॉन्स्टेबल विकास देशमुख करीत आहेत.
Tags
शोध पत्रिका ..