शहरातील शेकडो कोटींच्या विकासकामांचा आ. महाले यांनी घेतला आढावा...
चिखली :- दिनांक 1/03/2025 रोजी दुपारी एक वाजता चिखली नगरपरिषदेमध्ये आढावा बैठक संपन्न झाली. आमदार सौ श्वेताताई विद्याधर महाले यांच्या नेतृत्वात संपन्न झालेल्या या आढावा बैठकीमध्ये आमदार सौ. श्वेताताई विद्याधर महाले यांच्या नेतृत्वात संपन्न झालेल्या या आढावा बैठकीमध्ये शेकडो कोटींच्या विकास कामांचा आढावा घेण्यात आला.
मागील आर्थिक वर्षात मंजूर झालेली कामे, त्यातील सुरू असलेली कामे व पूर्ण झालेली कामे, त्या कामांचा दर्जा, प्रस्तावित व संपन्न विकास कामांमधून जनतेला मिळणाऱ्या सोयीसुविधा, त्यातून निर्माण होणाऱ्या विविध संधी यांचाही आढावा आ. महाले यांनी त्यांच्या खास शैलीत घेतला.विकासासाठी खर्च करण्यात येणाऱ्या प्रत्येक पैशामागे जनतेला कोणत्या सोयी उपलब्ध होतील?सामान्य जनतेच्या जीवनामध्ये त्यातून काय सकारात्मक परिणाम साधले जातील?चिखली शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सामान्यातील सामान्य माणसाचा ही सहभाग कसाा वाढवता येईल?आणि चिखली शहरातील अगदी खालच्या आर्थिक स्तरात असलेल्या मनुष्यालाही नगरपरिषद आणी अधिकारी, कर्मचारी हे केवळ फौज फाटा नसून आपल्या सामाजिक उन्नतीसाठी असलेले जनसेवक आहेत असा विश्वास कसा निर्माण करता येईल?यासंबंधी एक आदर्श वस्तू पाठच आमदार सौ श्वेताताई विद्याधर महाले यांनी घालून दिला.
सामान्य प्रशासन विभागातील नियमित व कंत्राटी मनुष्यबळ यांनी जनतेला अधिक तात्पर सेवा प्रदान कराव्यात जेणेकरून कागदाच्या पूर्ततेअभावी एखाद्या सामान्य मनुष्याला आपल्या मूलभूत अधिकाराचा फायदा घेता आला नाही तर तो त्याच्यावरील अन्याय ठरेल. त्यामुळे सामान्य प्रशासन विभागाने अधिक तत्पर व कार्यक्षम व्हायला हवे असे मत आमदार सौ. महाले यांनी व्यक्त केले.
सफाई कामगारांकडून संपूर्ण चिखली शहराची स्वच्छता करून घेण्याचे काम नगरपरिषदेचे असून याबाबतीत काही तक्रारी प्राप्त होत असल्याने कंत्राटदारांनी चिखली शहराच्या स्वछतेकडे अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचे नमूद करत सौ. श्वेता ताई महाले यांनी गरजेनुसार सफाई कामगारांना अधिक चांगल्या सुविधा पुरवता येण्यासाठी आवश्यक उपकरणे देण्यात यावी व जमा झालेल्या कचऱ्याला जमा करण्याकरिता सोबत असलेल्या हेल्पर यांनी जनतेला मदत करावी असे सांगितले. कचरा जमा करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या घंटागाड्या यांच्या दुरुस्तीची गरज असल्यास आवश्यकतेप्रमाणे त्यांची दुरुस्ती केली असावी त्याचप्रमाणे जमा झालेल्या कचऱ्याचे विघटन करून त्यातून कचऱ्याचे ढीग शहराच्या आजूबाजूला जमा होणार नाहीत असे प्रकल्प विविध धर्तीवर राबवण्यात यावेत व शहराच्या सौंदर्याला खराब करणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट तंत्रज्ञानाद्वारे अधिक सेंद्रिय पद्धतीने कशी करता येईल यासंबंधी आपल्या विविध विकसित ठिकाणाच्या प्रवासामध्ये पाहलेल्या प्रकल्पांची सुरुवात आपल्या शहरात कशी करता येईल यविषयी मार्गदर्शन केले.
चिखली शहरामध्ये बांधकाम विभागाअंतर्गत 2022 ते 2024 पर्यंत सुमारे 278 कोटी रुपयांच्या विविध बांधकामांना मंजुरी मिळालेली असून त्यापैकी बऱ्यापैकी कामे पूर्ण होण्यात असल्याबद्दल सौ. महाले यांनी समाधान व्यक्त केले तरीही माळी समाज भवनाच्या होत असलेल्या दुर्दशेबद्दल नाराजीही व्यक्त केली.आमदार सौ. महाले यांनी चिखली शहराच्या संपूर्ण पाणीपुरवठ्या करीता प्रस्तावीत 200 किलोमीटरची पाईपलाईनच्या कामाचा आढावा घेतला व त्यामध्ये बांधलेल्या सिमेंट रस्त्यांचे नुकसान कमीत कमी होऊन पाईपलाईन कार्यरत करण्यासंबंधी सूचना केल्या.
चिखली शहरातील 10 मोकळ्या जागाच्या सौंदर्यकरणा संबंधित मंजूर असलेले काम संबंधित कंत्राटदार यांना लवकरात लवकर पूर्ण करून देण्यासंबंधी सुचित करण्यास सांगण्यात आले.त्याचप्रमाणे जैन समाजाच्या समाज मंदिराची टाइल्स व इतर राहिलेले बांधकाम अतिशय उत्कृष्टरित्या लवकरात लवकर पूर्ण करण्यासंबंधी सूचना दिल्या.
हिंदू सूर्य महाराणा प्रताप यांच्या नावाने चिखली बाजारपेठेच्या सुरुवातीलाच असलेली कमान बांधकाम व सौंदर्यकरण यासाठी नगरपरिषदे कडून मान्य असलेली 15 लक्ष रुपये ही रक्कम कमी वाटल्याने आमदार सौ श्वेताताई महाले यांनी अधिक पंधरा ते वीस लक्ष रु. या कामांमध्ये टाकण्यास सांगून 30 ते 35 लक्ष रुपये खर्च करून हिंदूंसूर्य महाराणा प्रताप यांच्या नावाने अतिशय सुंदर व भव्य कमान बनवण्यास सुचित केले.विकासासंबंधी अधिक सूचना देताना सौ श्वेताताई महाले यांनी अपूर्ण स्वरूपातील प्रस्तावित कामे सुरू करावी अथवा त्या कामावरील निधी अधिक चांगल्या दुसऱ्या योजने करता हस्तांतरित करावा अशा देखील सूचना दिल्या.
शासनाने चिखली शहरासाठी दिलेल्या ओपन जिम अद्यापी पूर्णपणे पूर्ण क्षमतेने सुरू न झाल्याबद्दल आमदार सौ श्वेता ताई महाले यांनी नाराजी व्यक्त केली व त्वरित ओपन जिमचे सर्व सामान ठरलेल्या ठिकाणी त्वरित लावण्यात यावे व जिम सुरू करण्यात याव्या अशी सूचित केले.
चिखली शहरासाठी तयार करण्यात येत असलेल्या सांस्कृतिक भवनाच्या बांधकामाबाबत अधिक चांगले बांधकाम करण्यासंबंधी त्याचप्रमाणे या सांस्कृतिक भावनांमध्ये अतिशय उच्च दर्जाचे फर्निचर व साऊंड सिस्टिम लागतील याची काळजी घ्यावी यासंबंधी नगरपरिषद मुख्याधिकारी यांनी वैयक्तिक लक्ष द्यावे असे सूचित केले.
चिखली शहरासाठी सोलर पार्क निर्मितीसाठी चिखली नगरपरिषद ने पुढाकार घ्यावा व हरित ऊर्जा निर्मितीसाठी व वापरासाठी लोकांना उदयुक्त करावे.यासंबंधी शासकीय स्तरावरून सर्व मदत करण्याचे आपण प्रयत्न करू असे सौ. श्वेताताई महाले यांनी आश्वासन दिले.त्यासोबत चिखलीमध्ये नवीन एक्सप्रेस फीडर लवकरात लवकर सुरू करण्यात यावी यासंबंधी ही सौ श्वेताताई महाले यांनी सुचित केले.
Tags
आढावा बैठक...