चिखलीच्या आमदार विकास कन्या सौ० श्वेताताई विद्याधर महाले यांच्या वाढदिवसाच्या अनुषंगाने आज संपूर्ण जिल्हाभरात विविध समाज उपयोगी कार्यक्रम आणी शिबिरे यांचे आयोजन करण्यात आले होते.
*चिखली उपजिल्हा रुग्णालयात महाआरोग्य शिबीर*
चिखली मतदार संघाच्या लोकप्रिय आमदार विकास कन्या सौ. श्वेताताई विद्याधर महाले यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने चिखली उपजिल्हा रुग्णालयामध्ये माता व बाळसंगोपन शिबीर, तर महिलांसाठी गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, या शिबिराचे उद्घाटन भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य डॉ. प्रतापसिंग राजपूत यांनी केले.तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शिक्षण प्रसारक मंडळ चिखलीचे अध्यक्ष श्री रामकृष्ण दादा शेटे यांची उपस्थिती होती.ग्रामीण रुग्णालय चिखली येथे आमदार माननीय श्वेताताई महाले यांच्या प्रयत्नाने प्राप्त झालेल्या सर्वाइकल कॅन्सर डिव्हाईस( गर्भाशय मुखाचा कर्करोग तपासणी यंत्र) याचे लोकार्पण 21 फेब्रुवारी रोजी माननीय आमदार सौ. श्वेताताई महाले यांच्या हस्ते झाले होते.अगोदर चिखली येथे डायलिसिस सेंटर तसेच धाड येथे उपजिल्हा रुग्णालयामध्ये देखील अतिशय चांगल्या सुविधा माननीय आमदार श्वेताताई महाले यांनी उपलब्ध करून दिल्या आहेत.त्याचबरोबर चिखली येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये रेडियॉलॉजि विभाग सुरु करावा म्हणून आ. सौ. श्वेताताई महाले यांनी विधानसभेत तशी आग्रही मागणीदेखील केली आहे.सर्वसामान्याचे आरोग्य आणि सर्वसामान्यांचा विकास याची काळजी घेणारा लोकप्रतिनिधी आपल्याला लाभला आहे.आरोग्य विषयक सुविधा घेऊन शासन आपल्या दारापर्यंत येत आहे तर याचा योग्य फायदा घेऊन आपले आरोग्य अधिकाधिक चांगले कसे राहील याची काळजी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे.असे प्रतिपादन अध्यक्ष डॉ. श्री प्रतापसिंग राजपूत यांनी केले.
याप्रसंगी उपस्थितांमध्ये श्री विजयजी कोठारी ( प्रदेश कार्यकारणी सदस्य भाजप), श्री शिवाजीराव देशमुख (उपजिल्हाप्रमुख शिवसेना), सुरेश अप्पा खबुतरे (प्रदेश कार्यकारणी सदस्य भाजप) व इतर जन हजर होते.
*धाड येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये महाआरोग्य शिबिराचे आयोजन*
आमदार सौ. श्वेताताई महाले यांच्या वाढदिवसाच्या प्रित्यर्थ धाड येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये देखील महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.धाड येथील आरोग्य शिबिराचे उद्घाटन श्री सतीशजी गुप्त अध्यक्ष चिखली अर्बन यांच्या हस्ते झाले.तरी या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री मनोज दांडगे जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे होते. शिबिरामध्ये मोफत एनसी प्रोफाइल तपासणी, रक्तगट आणि आर एच घटक चाचणी, हेपीटीटीस बी प्रतिजन चाचणी, गर्भाशय मुखाचा कर्करोग तपासणी शिबिर, आणि इतर सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या.
झाड येथील ग्रामीण रुग्णालय मध्ये झालेल्या या महाआरोग्य शिबिरामध्ये आजू बाजूच्या परिसरातील अनेक रुग्ण, माता व भगिनी यांनी शिबिराचा लाभ घेऊन, गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग तपासणीचा विशेष लाभ महिलांनी मोठ्या प्रमाणावर घ्यावा, जेणेकरून रोग होण्याआधी प्रतिबंधात्मक उपचार करता येतील, आणि स्त्रियांच्या कष्टप्रद आयुष्यात आणखी कष्ट उद्भवणार नाहीत असे कार्यक्रमाचे उदघाटक श्री सतीश गुप्त म्हणाले.
याप्रसंगी धाड परिसरातील श्री देविदास जाधव,श्री तेजराव नरवाडे,श्री श्रीरंग अण्णा येंडोले व चिखलीतील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती.
*सोनेवाडी येथे दाखवीला "छावा " चित्रपट*
चिखलीच्या आमदार सौ श्वेताताई विद्याधर महाले यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सोनेवाडी येथील भाजप कार्यकर्त्यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्य व पराक्रमाच्या गाथेवर आधारलेला छत्रपती संभाजी महाराज यांचा जीवनपट असलेला हिंदी चित्रपट "छावा" सर्व ग्रामस्थांना दाखवण्यात आला.हिंदू धर्म अभिमानी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनाचा आदर्श घेऊन सुसंस्कारित व आपला ज्वलंत इतिहास माहित असलेली पिढी घडावी यासाठी देशभर गाजत असलेल्या या चित्रपटाचे प्रदर्शन ग्रामीण भागात करण्यात आल्याचे भाजप कार्यकर्ते म्हणाले.
*चिखली मध्ये महिलाशक्तीचा सन्मान...*
आमदार सौ श्वेता ताई महाले पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त चिखली विधानसभा मतदारसंघातील संपूर्ण ग्रामीण व शहरी भागातील अंगणवाडी सेविका,आशा स्वयंसेवीका व उमेद अभियानांतर्गत काम करणाऱ्या सर्व कंत्राटी सीआरपी महिला भगिनींना आ. सौ. श्वेताताई महाले पाटील यांच्याकडून प्रेमाची भेट म्हणून "साडी चोळी" भेट देण्यात आली. जमिनी स्तरावर काम करणाऱ्या या माता भगिनींचा योग्य तो सन्मान व्हावा ही सौ. श्वेता ताई महाले पाटील यांची संकल्पना होती, त्या संकल्पनेला मूर्त रूप देण्यासाठी अंगणवाडी सेविका अशा स्वयंसेविका व उमेद अभियाना अंतर्गत काम करणाऱ्या सीआरपी महिला भगिनी यांना वाढदिवसाची भेट म्हणून साडी चोळी प्रदान करण्यात आली.
Tags
chikhli विधानसभा...