आ.मनोज कायंदे यांचा सत्कार सोहळा उत्साहात


चिखली येथे राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक संपन्न..

चिखली:- जिल्हाभरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या संघटनात्मक बांधणी साठी सुरु असलेल्या दौऱ्या अंतर्गत चिखली येथे तालुका कार्यकारणीची आढावा बैठक श्रीराम नागरी पतसंस्था सभागृह,चिखली येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली..

यावेळी सर्व आघाड्यांच्या नवीन कार्यकारिणी स्थापन करण्यासंदर्भात विचारविनिमय करण्यात आला तसेच प्राधान्याने सर्व बूथ वर बूथ कमिटी कार्यरत करण्यासंदर्भात जिल्हाध्यक्ष मा. नाझेर काझी साहेब यांनी सूचित केले..

त्याचप्रमाणे येत्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठीच्या तयारीचा आढावा घेण्यात आला व राज्यभरात पक्षामार्फत सुरु असलेल्या सदस्य नोंदणी संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.

 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चिखलीच्या वतीने सिंदखेडराजा  विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार मनोज कायंदे हे विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल त्यांचा  सत्कार ही यावेळी करण्यात आला..

संपूर्ण पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या सदैव पाठीशी खंबीर पणे उभा असल्याचे सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार मनोजजी कायंदे यांनी आश्वाशीत केले.

संपूर्ण जिल्हाभरात रथाच्या माध्यमातून राष्ट्रवादी सदस्य नोंदणी अभियान मोहीम राबविणार असे मनोगत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज दांडगे यांनी यावेळी व्यक्त केले..

या कार्यक्रमा दरम्यान काहींचा पक्ष प्रवेश ही आमदार साहेबांच्या व मान्यवरांच्या हस्ते यावेळी झाला.
त्यांचे पक्षामध्ये स्वागत केले. 
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेखर बोन्द्रे यांनी केले.
यावेळी प्रदेश,जिल्हा व बुलडाणा, चिखली तालुक्यातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते...
Previous Post Next Post