चिखलीत मातंग कार्यकर्ता मेळावा संपन्न
चिखली : साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांचा विचार घेऊन मातंग समाजाचे एक राज्यव्यापी परिवर्तनवादी सामाजिक संघटना उभी करून अण्णाभाऊ साठे क्रांतीसेना या संघटनेच्या माध्यमातून समाजाला न्याय मिळवून देण्याचे काम डॉ.आण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन साठे करीत आहे. या संघटनेचे बुलढाणा जिल्हाअध्यक्ष राजेश गजानन पवार यांची निवड करण्यात आली असून असंख्य समाज बांधवांनी या संघटनेमध्ये प्रवेश केला आहे.
याप्रसंगी सत्कार सोहळ्याच्या व कार्यकर्ता मेळाव्याच्या कार्यक्रमाचे आयोजन ता. 21 फेब्रुवारी 2025 रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती हॉलमध्ये पार पडला. यावेळी सचिन साठे, राजेश पवार, प्रभाकर आवारे, नागेश पाटेकर, प्रदीप साळवे, विष्णू कांबळे, गणेश यंगड, भगवान गायकवाड, गजानन इरशीद, रवी अवसरमोल, गणेश अवसरमोल, राजू मानवतकर, संजय हिवाळे, मुकेश रणबावरे, दुर्गाताई भालेराव यांनी मार्गदर्शन केले. यावेळी दयानंद भालेराव, गजानन डोंगरदिवे, जगन साळवे, सचिन नाडे, योगेश मानवतकर, अंकुश बोरसे, परमेश्वर बोरसे, विठ्ठल तायडे, प्रतीक वानखेडे, रामदास अंभोरे, मनोहर अंभोरे, यांच्यासह असंख्य समाज बांधव उपस्थित होते.