चिखली: - आर्ट ऑफ लिविंग द्वारा जागतिक ख्यातीचे गायक विक्रम हाजरा यांच्या गान, ज्ञान व ध्यान असा त्रिवेणी संगम असलेल्या भजन सरिता कार्यक्रमाचे आयोजन आर्ट ऑफ लिविंग शाखा चिखली द्वारा करण्यात आल्याची माहिती श्रीराम नागरी सहकारी पतसंस्था च्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली. या पत्रकार परिषदेला श्रीराम नागरी पतसंस्थाचे अध्यक्ष पंडित दादा देशमुख प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी आर्ट ऑफ लिविंग चे सुनील भोजवानी, सुदर्शन खरात, मयूर अग्रवाल, प्रशांत राठोड, खुशी भोजवानी, कविता भोजवानी उपस्थित होते
या वेळी सुनील भोजवानी यांनी माहिती देतांना सांगितले की, जगभरात सुमारे १८० देशांमध्ये कार्यरत, आर्ट ऑफ लिव्हिंग ही एक ना नफा, शैक्षणिक आणि मानवतावादी संस्था आहे ज्याची स्थापना १९८१ मध्ये जगप्रसिद्ध मानवतावादी आणि आध्यात्मिक गुरु- गुरुदेव श्री श्री रवि शंकर यांनी केली आहे. आर्ट ऑफ लिविंग चे सर्व कार्यक्रम गुरुदेवांच्या तत्त्वज्ञानावर आधारित आहेत, "जोपर्यंत आपले मन तणावमुक्त आणि समाज हिंसामुक्त नसेल, तोपर्यंत आपण जागतिक शांतता साध्य करू शकत नाही." असे गुरुजींचे विचार आहेत. आर्ट ऑफ लिविंग द्वारा 24 जिल्ह्यातील 86 तालुक्यामध्ये जलसंधारण ची कामे केल्या गेली आहेत.
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे गायक कलाकार विक्रम हाजरा हे भारतीय संगीतातील अग्रगण्य नाव आहे श्री श्री रविशंकर यांच्या आर्ट ऑफ लिविंग शी संबंधित विक्रम हाजरा हे अनेक पैलू असलेले व्यक्तिमत्व आहे लेखक ,तत्त्वज्ञ ,आध्यात्मिक मार्गदर्शक ,शिक्षक, आणि प्रोग्रामर आहेत मुळात ते एक संगीतकार असून अध्यात्मिक रॉकस्टार म्हणून देखील त्यांना ओळखल्या जाते त्यांचे आजपर्यंत 20 हून अधिक अल्बम प्रसिद्ध झाले आहेत. तसेच 50 पेक्षा जास्त देशामध्ये त्यांच्या भजन सरिता चे कार्यक्रम झाले असून भक्ती संगीतामध्ये इलेक्ट्रिक गिटार व ज्याज रॉक सारखे माहोल आणण्याचे श्रेय त्यांना दिले जाते जागतिक संगीत शैलीमध्ये लोकसंगीत पारंपारिक मंत्र व प्राचीन तत्वज्ञान सादर करणारे ते पहिले असल्याने त्यांच्या कार्यक्रमास रोमांचक स्वरूप प्राप्त होते. विक्रम हाजरा अनेक ठिकाणी कॉन्सर्ट झाले आहेत अशा बहुविध व्यक्तिमत्त्वाच्या धनी असणाऱ्या विक्रम हाजरा यांचा भजन सरिता हा कार्यक्रम स्थानिक जिल्हा परिषद क्रीडा संकुल समोर दिनांक 1 मार्च 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता आयोजित करण्यात आला असून सदर कार्यक्रम निशुल्क आहे तरी सर्व नागरिकांनी या भक्तीरसंगीताचा आनंद घ्यावा असे आवाहन आर्ट ऑफ लिविंग चिखली द्वारा करण्यात आले आहे.
Tags
आर्ट ऑफ लिविंग...