*"त्या" विकृत मानसिकतेचा केला जाहीर निषेध*


*चिखलीत महायुती आक्रमक*
 *आ. महाले धमकी प्रकरण निषेधार्थ चक्काजाम आंदोलन* 

*नितीन फुलझाडे*
*चिखली:- मतदारसंघात भाजपच्या महायुतीच्या आमदार सौ श्वेताताई महाले पाटील यांना निनावी पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्याचा खळबळजनक प्रकार समोर आला असून आज 21 फेब्रुवारी रोजी याबाबत रीतसर तक्रार पोलीस स्टेशन चिखली येथे दाखल करण्यात आली आहे.*

   *यासंदर्भात सविस्तर असे की मागील काही काळात न प प्रशासनाने अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली असून जुना मेहकर रोड परिसरातील अतिक्रमणावर बुलडोझर चालल्याने काही समाजकंटकांना याबाबत मनात या कारवाईबाबत आमदार यांनी विशिष्ट जाती बद्दल कार्यवाही सुरू केल्याचा राग मनात ठेवून "सर तन से जुदा" या जिहादी नाऱ्याप्रमाणे सिनेस्टाईल पत्र लिहून धमकी दिल्याने चिखली शहर व परिसरातील महायुती कार्यकर्ते तथा हिंदू समाज आक्रमक झाला होता.पत्रामधील मजकुरानुसार आमदार महाले यांना जिवे मारण्याची धमकी कोणीतरी माथेफिरूने दिल्याने काही काळ चिखली शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. 

यासंदर्भात आमदार श्वेता महाले यांनी प्रसारमाध्यमांपुढे येत आपण सर्व समाजासाठी कामे करीत असून "सबका साथ सबका विकास" या नाऱ्याप्रमाणे सर्वांना सोबत घेऊन विकासाचे पर्व मतदार संघात सुरू केले असल्याचे सांगितले. या धमकी पत्रा संदर्भात माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांच्याशी चर्चा झाली असून पोलीस स्टेशन चिखली येथे तक्रार दाखल करणार असल्याचे सांगितले. चिखली शहरात होत असलेली अतिक्रमण हटाव कार्यवाही योग्यच असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. आशा धमक्यांना आपण भिक घालत नसून जशास तसे उत्तर दिले जाईल असे यावेळी आक्रमक झालेल्या जनतेचा सूर दिसून आला. 

आता या गंभीर बाबीकडे पोलीस प्रशासन कसे बघते व लवकरात लवकर धमकी देणाऱ्या त्या समाजकंटकास कसा अटकाव करते हे लवकरच कळेल. आरोपींना लवकरात लवकर जेरबंद करून कठोरात कठोर शासन करू असे आश्वासन पोलीस स्टेशन चिखलीचे ठाणेदार संग्राम पाटील यांनी नागरिकांना दिले व शांतता ठेवावी व कायदा सुव्यवस्था अभादित ठेवण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन केले.*
Previous Post Next Post