बॅग लिफ्टींग करणार्‍याच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या...


आरोपी राजगड मध्यप्रदेशचा, डीबी पथका ची कारवाई
चिखली : परराज्यातून दुसर्‍या राज्यात येवून बॅग लिफ्टींग करणार्‍या एका संशयीत आरोपींची चिखली पोलीसांनी मोठ्या शिताफीने मुसक्या आवळल्या असून सदर आरोपीकडून एकुण 2,51,200 रूपयांचा मुदद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. 
याबाबत सविस्तर असे की, ता. 17 फेब्रुवारी रोजी चिखली परिसरामध्ये चिखली पोलीस स्टेशन डिटेक्शन पथक
पेट्रोलींग करीत असतांना स्टेट बँक परिसरात एक इसम संशयास्पद आढळून आला होता. त्याची अधिक विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव शुभमसिह कुंदनसिह सिसोदीया (22) रा. कडीयासासी ता. पचोर जि. राजगड, मध्यप्रदेश असे सागितले होते. चौकशीदरम्यान मी कपडे विकण्याकरीता आलेलो असून त्याचेजवळ एक सोन्याची सौभाग्यवती पोथ वजनी अंदाजे 3 तोळे किमंती अंदाजे 2,40,000/- रूपये मिळुन आल्याने त्याला पोथ बाबतचे कागदपत्रे (बिल) विचारपुस केली असता त्या पोथचे बिल नसल्याने त्याचेवर अदखलपात्र गुन्हा क्र. 110/25 कलम 124 म.पो.का प्रमाणे कार्यवाही करण्यात आली आहे. नोव्हेंबर 2023 मध्ये सुध्दा चिखली येथे त्याने त्याचे साथीदारासह -एसबी आय बँक चिखली समोरुन एक बॅग लिफटीग केल्याची कबुली दिल्याने सदर आरोपीस अप.क्र 796/23 कलम 379 भादवी अटक करण्यात आली असुन त्याचे जवळ असलेल्या बॅगमधुन 11,200 रुपये जप्त करण्यात आली असून एकुण 2,51,200 रूपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.  
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक विश्व पानसरे, अपर पोलीस अधीक्षक बि. बि. महामुणी, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील, यांचे मार्गदर्शनाखाली ठाणेदार पो. नि. संग्राम पाटील, डि.बी. पथकाचे पोउपनि समाधान वडने, सफौ राजेंद्र काळे,  पोना अमोल गवई, पंढरीनाथ मिसाळ, प्रशांत धंदर, सागर कोल्हे, मपोहेकॉ माया सोनोने, मपोकॉ रुपाली उगले यांनी केली आहे.
Previous Post Next Post