जिल्हा परिषद हायस्कूल मंगरुळ नवघरे येथे "मी कलेक्टर होणारच" कार्यक्रम संपन्न

*नितीन फुलझाडे*
मंगरूळ नवघरे- जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय मंगरूळ  नवघरे येथे मिशन IAS अंतर्गत ' मी कलेक्टर होणारच या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे  प्राचार्य वसंतराव गाडेकर यांच्या अध्यक्षतेखाली  करण्यात आले होते .
   या कार्यक्रमासाठी अमरावती येथिल मिशन IAS या संस्थेचे संचालक प्रा. नरेशचंद्रजी काठोळे यांनी विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परिक्षांना सामोरे जातांना येणाऱ्या अडचणी व त्यावरील उपाय योजना  ओघवत्या शैलीत सांगून  IAS / IPS होण्यासाठीची संपूर्ण ABCD विविध दाखल्यांचा वापर करून सांगीतली . तसेच विद्यार्थ्यांनी निर्भयपणे स्पर्धा परीक्षांना सामोरे जाण्यासाठी नियोजन बद्ध व सातत्यपूर्ण अभ्यास केल्यास 
" मी कलेक्टर होणारच "  हे प्रभावीपणे  पटवून दिले .
     यावेळी शाळेतील कु . प्रियंका हरणे , कु . प्रतिक्षा गाडे , कु . समीक्षा गवई ,  कु . नम्रता जाधव , कु . प्रणाली लहाने , चैतन्य सुभाष वाकडे या विद्यार्थ्यांनी  स्पर्धा परीक्षे विषयी असलेली भीती व शंका दूर होण्यासाठी विविध प्रश्न विचारले असता प्रा. काठोळे यांनी समर्पक उत्तरे देऊन विद्यार्थ्यांचे समाधान केले . 
यावेळी शाळेतील  सर्व विद्यार्थी व शिक्षक मोठया संख्येने उपस्थित होते .
Previous Post Next Post