संत रविदास महाराज जयंती उत्साहात साजरी



चिखली (प्रति.) :- स्थानिक संभाजी नगर परिसरातील संत रविदास जयंती उत्सव समिती च्या वतीने राष्ट्रसंत संत रविदास महाराज यांची 648वी जयंती 12 फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

            या जयंतीनिमित्त प्रमुख पाहुणे सेवानिवृत गटशिक्षण अधिकारी भीमसेन शिराळे, प्रमुख अतिथी माजी मुख्याध्यापक भ.सु.खरात, माजी नगरसेवक रामदासभाऊ देव्हडे,माजी न.प.उपनगराध्यक्ष श्रीरामभाऊ झोरे , संत रविदास उत्सव समितीचे अध्यक्ष हिरामण डोंगरे, शांताबाई जोहरे महिला सदस्या,  उपस्थित होते. यावेळी संत शिरोमणी रविदास महाराज यांच्या प्रतिमेसह, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सर्वांना शिक्षनाची दारे खुले करणारे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला मान्यवरांनी हार व पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

            यावेळी मान्यवरांनी राष्ट्रसंत संत रविदास महाराज यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकून त्यांच्या कार्याची महती विषद केली. समाजामध्ये असलेल्या विविधी रूढी, परंपरा यांना फाटा देत आपल्या पाल्यांना शिक्षणासाठी प्रवृत्त करण्याचे आवाहन केले. सोबतच शासनाच्या विविध योजनांचा फायदा घेण्यासाठी संबंधित ठिकाणी अर्ज करण्याचे देखील आवाहन केले.

            यावेळी विष्णु जोगदंडे, हिरामण डोंगरे तथा सिरसाट सर यांनी संत रविदास महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकून त्यांच्यापासून आपण सर्वांनी बोध घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. आपण सर्वांनी सर्वच महापुरूषांचा आदर्श घेणे आवश्यक असून महापुरूषांचे जीवन हे आपणा सर्वांना प्रेरणादायी आहे. या महापुरूषांनी समाजात क्रांतीकारक बदल घडविले असून आज शिक्षणाचा खरा वापर आपण जीवनामध्ये करून जीवन जगले पाहिजे असे प्रतिपादन केले.

            यावेळी संत रविदास महाराज उत्सव समितीचे अध्यक्ष हिरामण डोंगरे, निंबोळे सर, सिरसाट सर, रमेश जोहरे, विष्णु जोगदंडे सर, पुरूषोत्तम चांदोरे, गणेश बडगे सर, राजु चिंचोले, दिलीप निंबोळे, विनोद ब्राम्हणे, पत्रकार विनोद खरे, राजु खन्सरे, भारत चांदोरे, डोंगरे सर, गजानन लहाने, फकिरा शिंगणे, रोहिदास पंढरे, सुशिल खरात, सुनिल चांदोरे, नानाभाऊ जोगदंडे, शिवचरण चांदोरे, शिपणे सर, राजगुरूसर, किसन खरे, महादु शिंगणे, गणेश चिंचोले यांच्या बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

Previous Post Next Post