जळगांव (खा.)येथे रुग्णांच्या मोफत शस्त्रक्रियेसाठी मासरूळ येथून गाडी रवाना...



मासरूळ येथून राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज दांडगे यांच्या पुढाकारातून बंधू संतोष दांडगे व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मासरुळ व परिसरातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या हस्ते हिरवी झेंडे दाखवून जळगावं खा.येथे रुग्णांना रवाना करण्यात आले.यामध्ये 24 रुग्णांचा समावेश आहे.या रुग्णांची शस्त्रक्रिया डॉ.उल्हास पाटील हॉस्पिटल जळगांव (खा.) येथे होणार आहे.यामध्ये सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्यात येणार असून आतापर्यंत गोदावरी फाऊंडेशन जळगाव खा.यांच्या माध्यमातून व श्री.मनोजभाऊ दांडगे यांच्या पुढाकारातून आतापर्यंत जवळपास  2500 पेक्षा जास्त यशस्वी शस्त्रक्रिया झाल्या आहेत..तसेच अनेक गरजवंत कुटुंबांचे मोफत आरोग्य तपासण्यात आली आहे.या उदघाटन प्रसंगी राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Previous Post Next Post