955 ग्रामस्थांनी घेतला आरोग्य शिबिराचा लाभ
चिखली:- 12 जानेवारी रोजी राष्ट्रमाता मॉ जिजाऊ जन्मोत्सवा निमित्त चिखली तालुका शिवसेनेच्या वतीने भव्य मोफत आरोग्य तपासणी व रोगनिदान शिबिर सवणा येथे घेण्यात आले. यावेळी शेकडो नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.ग्रामीण भागातील जनतेला वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हावी या हेतूने चिखली तालुका शिवसेना वतीने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते यावेळी सामान्य रुग्णालय चिखली तसेच बुलडाणा जिल्हा येथील तज्ञ डॉक्टरांची टीम सहभागी झाली होती.
आरोग्य अधिकारी आणि कर्मचारी यांनीदेखील सहभाग नोंदवून रुग्णाची तपासणी केली.ऐकून 955 जणांची तपासणी करण्यात आली.455 रुग्णांना मोफत चष्मे वाटप करण्यात आली. 34 रुग्णांवर डोळ्यांची शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे हे विशेष.
आरोग्य शिबिराचे उद्घाटक आपल्या जिल्हाचे भूमिपुत्र प्रतापरावजी जाधव साहेब केंद्रीय मंत्री आयुष(स्वतंत्र प्रभार),आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री भारत सरकार तसेच महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे खाजगी सचिव विद्याधरजी महाले साहेब,मायाताई मस्के(जिल्हा प्रमुख महिला आघाडी ),शिवाजीराव देशमुख (उपजिल्हा प्रमुख शिवसेना ),शरद हाडे (माजी जिल्हा परिषद सदस्य सवणा),विलास घोलप (चिखली शहर प्रमुख शिवसेना),कपिल खेडेकर, आयोजक प्राचार्य गजानन मोरे (शिवसेना तालुका प्रमुख चिखली),महायुती सर्व पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती या वेळी होती.*
Tags
आरोग्य शिबिर.....