आ.श्वेताताई महाले यांच्याहस्ते निवासी तहसीलदार हरी वीर यांचा सत्कार...


 चिखली:-  चिखली विधानसभेच्या आमदार सौ.श्वेताताई महाले पाटील यांनी तालुक्यातील कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांचा शाल श्रीफळ देवून सन्मान केले.यावेळी निवासी तहसिलदार हरी वीर यांचा सत्कार करण्यात आला.
प्रत्येक अधिकारी हा आपल्या कर्तव्याशी ईमान राखून काम करतो हे त्यांचे कर्तव्यच आहे परंतु अश्या अधिकारी व कर्मचार्‍यांना त्यांच्या कार्याची दखल घेत सन्मानाची थाप मिळाल्यास नक्कीच त्यांना कर्तव्य निभावतांना ऊर्जा मिळते. लोकप्रतिनिधींची इच्छाशक्ती व विकासात्मक दृष्टीकोनाला जर कर्तव्यदक्ष अधिकार्‍यांची साथ लाभली तर मतदार संघात विकासाची गंगा वाहू लागेल.
 प्रत्येक ठिकाणी लोकप्रतिनिधी पोहचू शकत नाही किंवा प्रत्येक नागरिकांशी संवाद साधणे त्यांच्या अडीअडचणी समजून घेणे शक्यता कमीच आहे, आपल्या मतदार संघातील नागरीकांना शासकीय सोयी सुविधा ह्या विनाविलंब तत्काळ मिळाव्या यासाठी कार्यतत्पर अधिकार्‍यांना प्रोत्साहन देणे पण गरजेचे आहे. आप आपल्या क्षेत्रात कर्तव्यतत्पर आसलेल्या अधिकार्‍यांचा आज विद्यमान आमदार श्वेता महाले पाटील यांनी शाल श्रीफळ देऊन सन्मान केला.
 चिखली शहरातील सुपरिचित असे निवासी तहसीलदार एच.डी.वीर ज्यांनी 17 वर्षे  देश सेवा करीत निवृत्ती घेतल्यावर  2004 मध्ये लोकसेवा करण्यासाठी महुसुल विभागात पदार्पण केले.
    वीर साहेबांचे सैंनिकी डीसिप्लिन , कायद्याची माहिती व लोकासेवेचा ध्यास पाहता त्यांनी सिंदखेड राजा येथे सेवेत रुजू असातांना भोसा येथील अग्निकांड असो किंवा प्रभारी नगर पालिका मुख्याधिकारी पदावर असतांना पाणी पुरवठा योजना राबविली असो या कामात त्यांनी अद्वितीय कामगिरी केली. त्यांना स्वच्छ सर्व्हेक्षण योजनेत विदर्भातून दुसरे योग्य रीतीने पार पाडणारे म्हणून सन्मान पण करण्यात आला होता.
 आपण जिथे जन्म घेतला त्या जन्मभूमीत पण सेवा घडावी या उद्देशाने एच डी वीर साहेबांनी चिखली येथे निवासी तहसीलदार म्हणून पदभार घेतला 2022 च्या अतिवृष्टीत पैनगंगा नदीच्या पात्रात आलेल्या पुरात अडकलेल्या ट्रक ड्रायव्हर ला सुखरूप बाहेर काढले या वेळी त्यांच्या सैनिक सेवेतील प्रशिक्षण खूप कामी आल्याने त्यांच्या या धाडसी यशाला प्रत्येक वृत्तपत्र व डिजिटल मीडियाने प्रसिद्धितून समोर आणले होते.
याच पैनगंगा नदीत वाहून गेलेल्या व्यक्तीचा मृतदेह तीन दिवसाच्या अथक प्रयत्नातून शोधून काढला. कृषिप्रधान देशातील शेती व शेतकरी वाद हे नेहमीच आढळून येतात तालुक्यातील पांधण रस्त्यांचा तंटा निकाली काढत 42 प्रकरणात हजारों शेतकर्‍यांना न्याय देण्याचे काम निवासी तहसीलदार वीर साहेबांनी केले.
चिखली शहरात कर्तव्यदक्ष, कार्यतत्पर अधिकारी लाभल्याने नागरीकांना जलद गतीने वेळेच्या आत सर्वच सेवा मिळत असल्याने नागरिक संतुष्ट आहेत. अधिकार्‍यांना वरिष्ठांचे पाठबळ व योग्य मार्गदर्शन मिळाल्यावर नागरीकांना सेवा देणे सोपे जाते. तसेच चिखली शहराचे विद्यमान तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी श्री.संतोष काकडे यांच्या कडून होत असलेली कामे ही प्रशंसनीय आहेत.
Previous Post Next Post