*१७९ भक्तगणांनी घेतली उपासक दिक्षा*
*९ शिलाई मशीनचे वाटप*
खबरबात न्यूज
मेहकर :- अनंत विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या क्रपा आशीर्वादाने व परमपुज्य कानीफनाथ महाराज यांच्या प्रेरणेने दिंनाक २२ जानेवारी रोजी मेहकर येथे पादुका दर्शन सोहळा अतीशय सुंदर आध्यात्मिक वातावरणात पार पडला. सकाळी मेहकर शहरातील राममंदिर चिखली रोड येथून रथामध्ये पादुका ठेवून बंजारा नृत्य,भजनी मंडळी भारतीय संस्कृतीप्रमाणे भक्तीमय वातावरणात मिरवणूक काढण्यात आली. या रँली मधे कलशधारी महीला, हाती,भगवे झेंडे घेवून पोलीस स्टेशन, जिजाऊ चौक व बस स्टॅन्ड मार्गाने जिजामाता कन्या शाळेच्या प्रांगनामध्ये उत्साहात व जल्लोषात आगमन झाले.
सर्व प्रथम २२ सुवासनिनी पादुकाचे पुजन व ओवाळणी केली. नंतर संतपिठावर पादुकाची विधीवत पुजन करण्यात आले.
या कार्यक्रमाला पश्चिम विदर्भ पीठ व्यस्थापक सुरेश मोरे,पीठ इंजिनियर श्री दिपक चिंचोले,पीठ सदस्य श्री संतोष दसरे सर, जिल्हा व पीठ महिला निरीक्षक सौ लताताई चिंचोले,पीठ प्रसिद्धी प्रमुख अमर इधोळ,जिल्हा अध्यक्ष श्री गणेश खडोळ, महिला प्र. निंभोरेताई, जि. सचिव प्रवीण कऱ्हाळे, जि. युवा प्र. मंगेश मोठे, पोफळेताई, खान्डेभराड, डोईफोडे, वाकोडेताई, नागरे, पडघान, सनान्सेताई सर्व जिल्हा कार्यकारिणी सदस्य तसेच प्रवचानकार सनान्से महाराज, गिऱ्हेताई वरील मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अनुषंगाने संस्थानाच्या वतीने अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात जसे की, ग्रामस्वच्छता अभियान, शैक्षणिक उपक्रमांतर्गत इंग्रजी माध्यमांची मोफत शाळा, मोफत वेदपाठ शाळा, रक्तदान शिबिर, वैद्यकीय उपक्रमांतर्गत मोफत दवाखाना, मरणोत्तर देहदान, मोफत रुग्णवाहिका सेवा - महाराष्ट्रात विविध महामार्गावर ५३ रुग्णवाहिका २४ तास अखंडपणे अपघातग्रस्तांच्या सेवेत कार्यरत आहेत. तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचे पुनर्वसन, महिला सक्षमीकरण अंतर्गत मोफत शिलाई यंत्र वाटप, मोफत घरघंटी वाटप, आपत्कालीन मदत उपक्रम, कायदेविषयक साक्षरता शिबिरे, रक्तदान शिबिर, ब्लड इन नीड आदी आयोजित केली जातात. अशी माहीती पिठ व्यवस्थापक सुरेश मोरे यानी दिली.
या अध्यात्मिक सोहळ्यामध्ये जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान यांच्या वतीने दुर्बल घटक पुनर्वसन उपक्रमांतर्गत गरीब व गरजू ९ महिलांना मोफत शिलाई मशीन मा. श्यामभाऊ उमाळकर प्र. सरचिटणीस, डॉ गणेश मांटे जिल्हा अध्यक्ष भाजपा, हभप ठोकळ महाराज वि. प्र. अध्यक्ष, घुले साहेब भाजपा, चिंचोले साहेब,चिंचोले ताई, शुभम एकूणकर यांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आल्या.सदर कार्यक्रमाला मा. आमदार श्री संजयजी रायमूलकर साहेब यांनी सुद्धा सिद्ध पादुकांचे दर्शन घेतले.
या कार्यक्रमामध्ये जनम प्रवचनकार श्री विलास परब यांनी आपल्या सुमधुर वाणीमधून सर्व भविकांना मंत्रमुग्ध केले यामध्ये असंख्य भावीकांनी गुरु पुजनाचा लाभ घेतला. या कार्यक्रमात नवीन १७९ भक्तगणानी उपासक दीक्षा घेतली.
गुरु माऊलींचा सीद्ध पादुकांचे सर्व भावीकांनी दर्शन घेतले.तसेच मा आमदार श्री सिद्धार्थजी खरात साहेब यांनी सुद्धा सिद्ध पादुकांचे दर्शन घेतले.
कार्यक्रमाच्या शेवटी पुष्पवृष्टि वाहुन कार्यक्रमाची सांगता झाली कार्यक्रम यशस्वितेसाठी पीठ इंजिनियर चिंचोले साहेब, पीठ सदस्य दसरे सर, जि. अध्यक्ष खडोळ सर, ता. अध्यक्ष बचाटे साहेब, दिनकर गारोळे, धनंजय जाधव, आत्माराम काळे, रामदास गिऱ्हे, देवकर, काकडे, दळवी,डॉ. जुमडे द.बुलढाणा जिल्हा निरीक्षक चिंचोले ताई ,प्रोटोकॉल अधिकारी,पिठ समिती, जिल्हा सेवासमीती,ता.सेवा समिती, सेवाकेंद्र समिती,संग्राम सैनिक,शिष्य,साधक ,उपासक यांनी कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न होण्याकरिता मेहनत घेतली.