माघी गणेश जयंती उत्सवाचे चिखलीमध्ये आयोजन..

👏👏 

नितीन फुलझाडे(खबरबात न्यूज):- चिखली येथील जुने गाव परिसरातील श्री गणपती मंदिरातर्फे दरवर्षी माघी गणेश जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात येते. या उत्सवाचे यंदाचे हे १९ वे वर्ष आहे. सात दिवस चालणाऱ्या या सोहळ्यामध्ये भजन, कीर्तन, पालखी सोहळा, सांस्कृतिक कार्यक्रम अशी रेलचेल असणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीदेखील गणपती संस्थान जुनेगाव मंदिरातर्फे माघी गणेश जयंती उत्सव मोठ्या उत्सहात साजरा करण्यात येणार आहे. हा गणेश जयंती उत्सव सोहळा २६ जानेवारी ते १ फेब्रुवारी असा सात दिवस चालणार आहे. सोहळ्याच्या पहिल्या दिवशी सकाळी ११ ते ४ रक्तदान शिबिर, रात्री आठ वाजता ह भ प ज्ञानेश्वर महाराज गाडेकर यांचे हरी किर्तन दुसऱ्या दिवशी हभप इंदोर ह भ प सुधीर भाऊ देशपांडे अकोला यांचे प्रवचन व तिसऱ्या दिवशी रात्री आठ वाजता ह भ प प्रकाश महाराज जवंजाळ यांचे कीर्तन. चौथ्या दिवशी रात्री आठ वाजता ह भ प सुधव्ह महाराज केणेकर यांचे हरिकीर्तन पाचव्या दिवशी दुपारी चार वाजता सामूहिक गणपती अथर्वशीर्ष रात्री आठ वाजता नुपूर नृत्य निकेतन नागपूर प्रस्तुत गीत रामायण सहाव्या दिवशी रात्री आठ वाजता ह भ प रामेश्वर महाराज हिवाळे सर यांचे हरि शनिवार दिनांक एक फेब्रुवारी रोजी सकाळी सात वाजता सामूहिक आवर्तने ८:३० महाआरती 10 वाजता शोभायात्रा नंतर काल्याचे किर्तन ह भ प श्री शाम महाराज डाकोरकर दुपारी ३ ते ५ महाप्रसाद त्यानंतर सायंकाळी ७:३० वाजता फटाक्याची आतिषबाजी रात्री ८:३० वाजता भजन संध्या अशा भरगच्च कार्यक्रमाची रेलचेल या सोहळ्यात असणार आहे तरी या सर्व कार्यक्रमास शहरवासीयांनी उपस्थित रहावे असे आवाहन विश्वस्त मंडळ श्री गणपती संस्थान जुने गाव चिखली यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Previous Post Next Post