सिने अभिनेता क्रांती नाना मळेगावकर व बालगायिका टीव्ही स्टार सह्याद्री मळेगावकर या सेलिब्रिटींची विशेष उपस्थितीती...
चिखली : आपला पारंपारिक सांस्कृतिक ठेवा जतन करत महिलांमध्ये एकत्रीकरण व या एकत्रीकरणातून सक्षमीकरण व्हावे या उद्देशाने आ. श्वेताताई महाले यांच्या संकल्पनेतून तोरणा महिला अर्बन को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या वतीने मकर संक्रांतीच्या निमित्ताने न्यू होम मिनिस्टर खेळ पैठणीचा सन्मान नारीशक्तीच या सामूहिक हळदीकुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन दि. २५ जानेवारी रोजी चिखली येथील राजाभाऊ बोंद्रे नगरपालिका माध्यमिक विद्यालयात करण्यात आले आहे. सिने अभिनेता क्रांती नाना मळेगावकर व बालगायिका टीव्ही स्टार सह्याद्री मळेगावकर या सेलिब्रिटींच्या विशेष उपस्थितीत साजरा होणाऱ्या या कार्यक्रमास चिखली शहरातील समस्त सुवासिनी व माता भगिनींनी आवर्जून उपस्थित राहून सदाबहार खेळ तसेच आकर्षक बक्षीसांचा आनंद लुटावा असे आवाहन तोरणा महिला अर्बन सोसायटीच्या वतीने करण्यात आले आहे.
आ. श्वेताताई महाले यांच्या कल्पक नेतृत्वातून चिखली मतदारसंघाचा चौफेर विकास सुरू असतानाच या विकासाला सांस्कृतिक किनार देखील देण्याचे भूमिका आ. महाले या घेत असतात. याच भूमिकेतून दरवर्षी मकर संक्रांतीच्या पर्वावर सामूहिक हळदी कुंकवाचा कार्यक्रम " खेळ पैठणीचा सन्मान नारी शक्तीचा " या नावाने श्वेताताईंकडून तोरणा महिला अर्बन को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या माध्यमातून आयोजित केला जातो. मतदारसंघात शहर व ग्रामीण भागात वेगवेगळ्या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन दरवर्षी केले जाते. याच मालिकेत येत्या शनिवारी २५ जानेवारी रोजी शहरातील राजाभाऊ बोंद्रे नगरपालिका माध्यमिक विद्यालयात दुपारी ३ वाजता सामूहिक हळदी कुंकवाच्या निमित्ताने खेळ पैठणीचा रंगणार आहे. सिने अभिनेता क्रांतीनाना मळेगावकर व बालगायिका टीव्ही स्टार सह्याद्री मळेगावकर यांची विशेष उपस्थिती हे या कार्यक्रमाचे खास आकर्षण ठरणार आहे. या कार्यक्रमात पारंपारिक खेळ, उखाणे, फुगड्या याचा मनमुराद आनंद आणि आकर्षक बक्षीस बक्षीसांची व लयलूट होणार असून सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करणाऱ्या विजेत्या माता - भगिनीला पैठणीचा बहुमान देखील मिळणार आहे. त्याकरिता चिखली शहरातील सुहासिनी आणि माता भगिनींनी जास्तीत जास्त संख्येने या कार्यक्रमास सहभागी होऊन खेळांचा आनंद लुटावा व बक्षीसांची लयलूट करावी असे आवाहन तोरणा महिला अर्बन को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या वतीने करण्यात आले आहे.