चिखली:- दिनांक 19 जानेवारी 2025 रोजी संत खटकेश्वर महाराज संस्थान येथे राष्ट्रसंत भगवान बाबा यांची पुण्यतिथी व वंजारी समाज मेळावा मोठ्या उत्साहामध्ये वंजारी समाज बांधवांनी साजरा करण्यात केला.त्यामध्ये हभप श्री अशोक महाराज पवळ यांनी प्रवचन करून समाजाला योग्य असे मार्गदर्शन केले.त्यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री विवेक पवळ यांनी केले तर प्रस्ताविक श्री गजाननजी मुंढे यांनी केले. श्री नारायणरावजी काळे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमाला विशेष उपस्थिती भेट म्हणून चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ.श्वेताताई महाले पाटील व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे खाजगी सचिव श्री विद्याधरजी महाले साहेब हे उपस्थित होते, प्रमुख पाहुणे म्हणून श्री सुरेश आप्पाजी खबुतरे तसेच कार्यक्रम पार पाडण्यासाठी,श्री केशवराव नागरे,श्री गजाननजी मुंढे,श्री रघुनाथजी पवळ,श्री श्रीधरजी पवळ, श्री उद्धव वाघ,श्री विनोद वाघ,श्री जितेंद्र कापसे,श्री बळीराम काळे श्री देवानंद वाघ,श्री शार्दूल कापसे,श्रीशैलेश कापसे, श्री सुनील धुंदळे श्री संजय घुगे श्री गजानन काळुसे श्री गजानन सानप श्री संजय वाघ श्री सचिन गीते श्री तेजीराव काळे श्री सचिन वाघ श्री सुशील वाघ यांनी प्रयत्न केले व चिखली तालुक्यातील सर्व वंजारी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री शार्दुल जी कापसे यांनी केले व नंतर स्नेहा भोजनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
Tags
समाज मेळावा...