चिखली येथे जन्मभूमी विकास अर्बनच्या वतीने संस्थापक अध्यक्ष मनोज दांडगे यांच्या कल्पनेतून दिनांक 19 जानेवारी रोजी मकर संक्रांतनिमित्त हळदी-कुंकूवाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
प्रत्येक सुवासिनी ही साक्षात आदिशक्तीचे प्रतीक आहे. त्यांना हळद-कुंकू लावताना आपण त्यांच्या माध्यमातून देवीचे तत्त्व जागृत करतो. यामुळे केवळ आध्यात्मिकच नाही, तर आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा देखील निर्माण होते.असे प्रतिपादन श्वेताताई महाले यांनी केले.
या सोहळ्यामध्ये सुवासिनींना वाण देणे,उखाणे, गाणी,खेळ आणि गोडधोड पदार्थांचा आनंद घेतला जातो.
हळदी कुंकू समारंभ हा हिंदू संस्कृतीचे जपणूक करणारा समारंभ आहे. या समारंभाच्या माध्यमातून महिला एकत्र येतात, हळदी कुंकू करतात, वाण लुटतात त्यामुळे त्यांची एकमेकींशी ओळख होते आणि स्नेह वाढतो.
आयोजित कार्यक्रमाप्रसंगी चिखली मतदार संघाच्या आमदार सौ.श्वेताताई महाले पाटील तसेच सौ. रेखाताई खेडेकर, वृषालीताई बोन्द्रे, ज्योतीताई खेडेकर, जयश्रीताई देशमुख यांची उपस्थिती होती.
दरम्यान राजकीय क्षेत्रातील तसेच सामाजिक क्षेत्रातील महिला हि मोठया संख्येने या कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या.आलेल्या सर्व महिलांचा दांडगे परिवाराच्या वतीने सन्मान करण्यात आला.
Tags
हळदी कुंकू...